Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : नगरमधील नेवासा, श्रीगोंदा तालुक्यांत फळबागांना फटका

Unseasonal Rain : नगर जिल्ह्यातील नेवासे, जामखेड, श्रीगोंदा तालुक्यांत शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : नगर जिल्ह्यातील नेवासे, जामखेड, श्रीगोंदा तालुक्यांत शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाचा फारसा जोर नसला तरी काही भागात वादळी वारा होता. त्याचा फळबागांना फटका बसला आहे.

नगर जिल्ह्यात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. उन्हाचा उकाडाही प्रचंड असल्याने लोक त्रस्त आहेत. अवकाळी पावसाची शक्यता असतानाच कांदा व काही भागात गव्हाची काढणी काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.

शुक्रवारी सायंकाळी नेवासा तालुक्यातील देडगाव, कौठा, चांदे आणि पाचुंदा परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी काढणी करून शेतात ठेवलेला कांदा पावसाने काही प्रमाणात भिजला. काढणीला आलेल्या गव्हाचेही नुकसान झाले.

पातीखाली झाकून ठेवलेला कांदा भिजला असल्याचे देडगाव येथील शेतकरी संतोष तांबे यांनी सांगितले. कौठा भागात तुरळक पाऊस झाल्याने नुकसानीचे संकट टळले असल्याचे रावसाहेब काळे व सागर दरंदले यांनी सांगितले.

चांदे भागात कांदा, गहू पिकाचे नुकसान होऊन काही ठिकाणी गावरान आंब्याच्या कैऱ्या पडल्या आहेत. श्रीगोंदा, जामखेडमधील काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bacchu Kadu Protest: कापूस आयात आणि बोगस औषधांमुळे शेतकरी संकटात; बच्चू कडू

Dairy Farming Success : प्रतिकूल परिस्थितीवर केली धीरोदात्तपणे मात

Amul Dairy Election : गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का, ‘अमूल’वर भाजपचे वर्चस्व

Maharashtra Politics : असे मंत्री, अशा तऱ्हा

E Crop Survey : ई-पीक पाहणीसाठी २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; सर्व्हरचा गोंधळ मिटणार कधी?

SCROLL FOR NEXT