Crop Damage : अमरावती जिल्ह्यात नुकसान पोचले ५३ हजार हेक्‍टरवर

Hailstorm : वरुड, मोर्शी तालुक्‍यात सर्वाधिक ७० हजार हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे. या दोन तालुक्यांत गारपिटीमुळे संत्र्यांचा ८५ ते ९० टक्‍के बहार गळाला.
Crop Damage
Crop Damage Agrowon

Amaravati News : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत अवकाळी पाऊस, गारपीट तसेच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुरती दाणादाण उडाली आहे. प्रशासनाकडून या नुकसानीचे जलदगतीने सर्व्हेक्षण करीत प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार एकट्या अमरावती जिल्ह्यात सुमारे ५३ हजार ३९२.८८ हेक्‍टरवर पिकांचे नुकसान झाले आहे.

वरुड, मोर्शी तालुक्‍यात सर्वाधिक ७० हजार हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे. या दोन तालुक्यांत गारपिटीमुळे संत्र्यांचा ८५ ते ९० टक्‍के बहार गळाला. कृषी व महसूल विभागाच्या प्राथमिक सर्व्हेक्षणात शुक्रवार (ता.१२) पर्यंत जिल्ह्यातील ११ तालुक्‍याअंतर्गत ६६३ गावांना गारपीट, पावसाचा फटका बसला. त्यामध्ये सर्वाधिक १८६ गावे ही अचलपूर तालुक्‍यातील आहेत. त्यानंतर १७२ चांदूरबाजार, ११४ मोर्शी, दर्यापूर ६२, अंजनगावसूर्जी ५५, वरुड ४०, भातकुली २२, चिखलदरा ६, चांदूररेल्वे २, धामणगावरेल्वे तालुक्यातील ४ गावे आहेत.

Crop Damage
Unseasonal Rain : वादळी पाऊस, गारपिटीने पिकांची दैना सुरूच

प्रशासनाने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार पीकनिहाय झालेले नुकसान (हेक्‍टरमध्ये) पुढीलप्रमाणे आहे. गहू ३६२२.९०, हरभरा २२३.९०, ज्वारी १४४२, मका २०, भुईमूग १७, तीळ २३१.४०, भाजीपाला/कांदा ३१३९.९०, पपई ५.५०, संत्रा-मोसंबी-लिंबू ४३ हजार ९८४.४५, केळी ५९६.०८, आंबा ८.२५, इतर १०१.८० याप्रमाणे आहे.

Crop Damage
Unseasonal Rain : नांदेडला अनेक भागांत अवकाळी पावसाचा दणका

असे आहे तालुकानिहाय बाधित क्षेत्र

भातकुली ः ११६.०८

चांदूररेल्वे ः २७

नांदगाव खंडेश्‍वर ः ०.४०

धामणगावरेल्वे ः १८८

अचलपूर ः १८ हजार ९८१

अंजनगावसूर्जी ः ७३५

चिखलदरा ः ७.५०

दर्यापूर ः ३७८

ः ६७८६.५०

चांदूरबाजार ः १८ हजार ८६६

वरुड ः ७३०७

एकूण ः ५३ हजार ३९२.८८

वर्धा जिल्ह्यात ९५ हेक्‍टर नुकसान

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात सुमारे ९५ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. वर्धा ४८.२०, सेलू १२.६० तर हिंगणघाट तालुक्‍यात ३४.६० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

पश्‍चिम विदर्भात १२ हजार हेक्टरला फटका

पाऊस, वादळ व गारपिटीमुळे अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत १२ हजार हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रामुख्याने अकोला जिल्ह्यात अधिक नुकसान झाले आहे. यंत्रणांकडून नुकसानीच्या माहितीचे संकलन सुरू आहे.

त्यामुळे नुकसान वाढण्याची भीती आहे. वाशीम जिल्ह्यात साडेतीन हजार हेक्टरपेक्षा अधिक नुकसान आहे. रिसोडमध्ये १५५७, मंगरूळपीर ९५२, मालेगाव ९५० तर वाशीम तालुक्यात १०० हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यातही खामगाव, नांदुरा, मलकापूर, चिखली, मोताळा तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. याही जिल्ह्यातील पीक नुकसानीचे क्षेत्र साडेतीन हजार हेक्टरपेक्षा अधिक आहे. या जिल्ह्यांमध्ये २६ एप्रिलला लोकसभा निवडणूक होत आहे. यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली आहे. पुरेशा यंत्रणेअभावी पंचनामे संथ गतीने सुरू आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com