Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Orchard : संत्रा बागांना हवामानाचा ट्रिगर लागूनही मदत नाही

Awaiting farmer help : महसुल मंडलात संत्रा मृग बहार २०२३ - २४ फळ पीकविमा योजनेच्या ट्रिगरमध्ये बसत असूनही हे उत्पादक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

Team Agrowon

Buldhana News : पिकांना हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल. यासाठी फळ पीकविमा योजना सुरू करण्यात आली. फळपीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारीत पीकविमा योजना राबवली जात आहे. मात्र, संग्रामपूर तालुक्यात सोनाळा, बावनबीर महसुल मंडलात संत्रा मृग बहार २०२३ - २४ फळ पीकविमा योजनेच्या ट्रिगरमध्ये बसत असूनही हे उत्पादक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

मृग बहार येण्याकरिता जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा दुसरा आठवडा या कालावधीत संत्रा बागेतील जमिनीमध्ये भरपूर ओलावा असणे आवश्यक आहे. या कालावधीत किमान २०० ते २५० मिलिमिटर पाऊस पडलेला असावा. जर या कालावधीत पाऊस १५० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडल्यास बहार येण्यामध्ये अडचणी निर्माण होतात.

मृग नक्षत्राचे पहिले एक दोन पाऊस जोराचे म्हणजेच ४० ते ५० मिलिमीटर असावेत तसेच या कालावधीत ढगाळ वातावरण राहून ५ ते ६ दिवसांची पावसाची झड असावी. तसेच हवेतील आर्द्रता ८० ते ९० टक्के असणे जरुरी आहे. अशा अनुकूल हवामानात संत्र्याला मृग बहर येतो. परंतु ही अनुकूल परिस्थिती निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी उपलब्ध नसल्यामुळे तालुक्यातील संत्रा बागा मोठ्या प्रमाणात फटका बसला.

शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत पाहून आपल्या संत्रा बागा ताणावर सोडल्या होत्या. मात्र, जूनमध्ये अपुरा पाऊस पडल्याने जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला नाही. १५ जून ते १५ जुलै या कालावधीत पीकविमा ट्रिगरनुसार १२४ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद असणे गरजेचे असते. मात्र, याच कालावधीत सोनाळा महसूल मंडळात १०१.९ मिलिमीटर तर बावनबीर महसुल मंडलात १०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने सोनाळा, बावनबीर महसूल मंडल संत्रा मृग बहारासाठी पीकविमा मिळण्यास पात्र आहेत, असे या भागातील संत्रा उत्पादकांचे म्हणणे आहे.

सोनाळा महसूल मंडल पात्र असताना शेतकरी गेल्या ३ महिन्यांपासून मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांना १८ टक्के व्याजासह पीकविमा रक्कम मिळायलाच पाहिजे. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
गजानन धुर्डे, संत्रा उत्पादक शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Floating Solar Project: उजनी जलाशयावर केवळ नऊ टक्के क्षेत्रावरच ‘फ्लोटिंग सोलार’ प्रकल्प; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे स्पष्टीकरण

Wild Boar Attack: शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस; कपाशी पिकाचे नुकसान

Drought Management: बांधबंदिस्ती, जलसंधारण, पीक नियोजनानेच दुष्काळावर मात शक्य; पोपटराव पवार

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगरला जिल्हा बॅंकेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान; एकूण सत्तावीस उमेदवार; मंगळवारी मतमोजणी

Maize Trading: चांदूरबाजारमध्ये मक्याची उलाढाल वाढली

SCROLL FOR NEXT