Crop Insurance : मालेगावातील २७ गावे पीकविम्यापासून वंचित

Deprived of Crop Insurance : शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा काढला होता पण पीकविमा कंपन्यांकरून महसूल मंडलात पावसाचा तीन ते चार आठवड्यांचा खंड नसल्यामुळे या गावांना अपात्र केल्याचे सांगितले जात आहे.
Farmer Issue
Farmer IssueAgrowon

Nashik News : मालेगांव तालुक्यातील सायने बु. व करजगव्हाण महसूल मंडलातील २७ गावांच्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा काढला होता. मात्र पीकविमा कंपन्यांकरून महसूल मंडलात पावसाचा तीन ते चार आठवड्यांचा खंड नसल्यामुळे या गावांना अपात्र केल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

तसेच या गावांमध्ये जवळपास एक महिना पाऊस नव्हता. त्यामुळे वास्तविक परिस्थिती नाकारून शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित ठेवले जात आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे याप्रश्‍नी मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांना निवेदन सादर करत संताप व्यक्त करण्यात आला आहे.

Farmer Issue
Crop Insurance : पीकविमा यादीसाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक

पालकमंत्री दादा भुसे यांच्या तालुक्यात शेतकऱ्यांनी पीक विम्याचा लाभ नाकारल्याने थेट अपर जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. या वेळी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, ओरिएंटल पीक इन्शुरन्स कंपनीच्या म्हणण्यानुसार महसूल मंडलात पावसाचा तीन ते चार आठवड्याचा खंड नसल्यामुळे सायणे महसूल मंडलातील दरेगाव, सवंदगाव, सायने खुर्द, मानके, दहिकुटे, जळकु, गिगाव, दहिवाळ, बोधे, दसाने, लोणवाडे, माल्हनगाव, खलाणे, सिताणे, अजंदे खु, माणके व करजगव्हाण महसूल मंडलातील करजगव्हाणकुकाणे, कंक्राळे, निमशेवडी, गडबड, वडगाव, लेंडाणे, द्याणे, खडकी व हाताने या गावांना अपात्र करण्यात आले आहे.

एकीकडे राज्य शासन दुष्काळ जाहीर करते व ज्या गावांना अपात्र ठरविण्यात येत आहे; त्या गावांसह संपूर्ण तालुक्यात पावसाने सलग महिना ते दीड महिना पावसाने दडी मारलेली होती. अनेक महसूल मंडलांत पर्जन्यमापक हे सदोष अवस्थेत आहे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीसारख्या पीकविमा कंपन्या या उंटावर बसून शेळ्या हाकण्याचे काम करत आहे.

वास्तव नाकारून करोडो रुपयांचा शेतकऱ्यांकडून हप्ता गोळा करून शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाण्याचे काम करत आहेत. या पीकविमा कंपन्यांकडे क्षेत्रीय अहवाल संकलन करण्याची कुठलीही यंत्रणा नसताना शेतकऱ्यांना व शासनाला फसविण्याचे काम या कंपन्या करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

Farmer Issue
Crop Insurance Company : विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण

यासह झोडगे मंडलातील भिलकोट व चिखलओहोळ ही गावेही अडचणीत आहेत. निवेदन देतेवेळी बोधे-दहिवाळ ग्रामपंचायत सदस्य प्रा. हिरालाल नरवाडे, त्रिदल सैनिक संघटनेचे समन्वयक अनिल जाधव, अतुल देसले, राजेंद्र देवरे, सतीश चव्हाण, सतीश वैद्य, डॉ. दीपक सूर्यवंशी, अमृत कळमकर, किसान युवाक्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष गोरख निकम, श्याम पवार, शांताराम सोनवणे, सुधीर देसले, पंडित देसले, राजधर वाघ, राजेंद्र सूर्यवंशी, बापू वाघ आदी उपस्थित होते.

पीक जनहित याचिका दाखल करणार एकीकडे दुष्काळ असल्याने शेतकरी अडचणीत आहे, तर दुसरीकडे शेतीमालाला भाव नाही. अशी गंभीर परिस्थिती असताना अनेक गावांत पिण्यासाठी पाणी नाही. त्यात माळमाथा परिसर दुष्काळी आहे. असे असताना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने या दोन्ही महसूल मंडलांना पत्र काढून अपात्र ठरविले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेता पीकविमा कंपन्यांना शेतकऱ्यांना दुष्काळात साह्य करण्याचे निर्देश देण्यात यावेत; अन्यथा या पीकविमा कंपन्यांच्या विरोधात तत्काळ जनहित याचिका दाखल करण्यात येईल व आचारसंहिता संपल्यानंतर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com