Orange  Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Farmer Issue : संत्रा उत्पादक शेतकरी संकटात

Orange Rate : स्थानिक ठिकाणच्या बाजारपेठेमध्येही संत्रा कवडीमोल दराने विकल्या जात असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.

Team Agrowon

Washim News : बाजारपेठेत मागणी नसल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी संत्रा बागांचे सौदे सोडले. स्थानिक ठिकाणच्या बाजारपेठेमध्येही संत्रा कवडीमोल दराने विकल्या जात असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. वेळेवर तोडणी न झाल्याने अर्ध्यापेक्षा जास्त संत्रा फळे गळून पडत आहेत. मागील काही वर्षात संत्रा उत्पादक शेतकरी पहिल्यांदाच एवढ्या प्रमाणात संकटात आला आहे.

या तालुक्यातील शेतकरी गेल्या काही वर्षात फळबाग लागवडीकडे वळाला आहे. शासनाकडून फळबाग लागवडीला प्रोत्साहन तसेच अनुदानही दिले जात आहे. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात संत्रा व इतर फळबागाचे क्षेत्र वाढले.

रिसोड तालुक्यात संत्रा लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली. मागील वर्षी संत्र्याची मागणी वाढल्यामुळे चांगला दरही मिळाला होता. मागील वर्षी संत्र्याला ८०० ते १००० रुपयांपर्यंत प्रति क्रेटचा दर मिळाला होता. त्यामुळे या वर्षी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्र्यापासून चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा होती.

त्यामुळे शेतकऱ्यांनी बागेची निगा राखून बहर व्यवस्थापन केले. व्यापाऱ्यांनी जुलै- ऑगस्ट मध्येच शेतकऱ्यांना इसार देऊन सौदे केले होते. निर्यात शुल्कामध्ये वाढ झाल्यामुळे तसेच इतर राज्यातही संत्र्याची मागणी घटल्यामुळे व्यापाऱ्यांनी आता सौदे सोडले. ते बागांकडे फिरकण्यासही तयार नाहीत.

एवढेच नव्हे तर दिलेला इसार परत मागत आहेत. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले. संत्र्याची तोडणी झालेली नसल्याने संपूर्ण अर्थकारण बिघडले. काही शेतकरी स्थानिक बाजारपेठेत तसेच द्वारपोच संत्रा विक्री करीत आहेत. परंतु यामध्ये खर्च वजा जाता मजुरीही निघत नसल्याचे नेतन्सा (ता. रिसोड) येथील संत्रा उत्पादक शेतकरी गजानन बाजड यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Relief GR: अवकाळीग्रस्त ९ जिल्ह्यांतील ६६ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ५३ कोटी ७३ लाख मदत मंजूर

Cotton, Soybean Rate: हळदीच्या भावात सुधारणा होण्याचे संकेत आहेत का ?

Village Development: गावच्या विकास निधीसाठी आता ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र अनिवार्य

Silk Production: ‘महारेशीम अभियाना’ला नांदेड जिल्ह्यात प्रतिसाद: वडवळे

Kharif Season: खरीप पिकांच्या ७० हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

SCROLL FOR NEXT