Orange Producer : शेतकरीच बनले संत्रा विक्रेते

Producer to Consumer Concept : संत्रा उत्पादकांच्या माध्यमातून उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेतून थेट संत्रा विक्री सुरू झाली आहे.
Orange
OrangeAgrowon
Published on
Updated on

Washim News : मागील सहा-सात वर्षांपासून वाशीम कृषी विज्ञान केंद्रातील उद्यानविद्या विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संत्रा लागवडीपासून ते काढणीपर्यंत तांत्रिक पाठबळ उपलब्ध करून दिले जात आहे.

परिणामतः जिल्ह्यातील संत्रा बागांमध्ये मृग बहाराची फळे मोठ्या प्रमाणात लागली. परंतु या वर्षात दरांमध्ये घसरण झाल्याने उत्पादक अडचणीत आले. या स्थितीत मार्केटिंग साठीही प्रयत्न सुरू झाले आहेत. याला ग्राहकांचा चांगला प्रतिसादही मिळतो आहे.

गेल्या काही वर्षांत यंदा संत्र्याची विक्री व दरात मोठी घसरण यावर्षी शेतकऱ्यांना अडचणीची ठरली आहे. या परिस्थितीतूनही मार्ग काढण्याची धडपड सुरू आहे. उद्यानविद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील यांनी संत्रा उत्पादकांना तांत्रिक सेवेसोबतच संघटनेचे महत्त्व सांगत वाशीम जिल्हा संत्रा उत्पादक संघ व नवचैतन्य कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनी तयार केली.

या माध्यमातून वाशीम ऑरेंज (डब्लूएओ) या नावाने संत्र्याचा ब्रॅंड सुद्धा तयार केला. आता या ब्रँडच्या नावाने संत्रा उत्पादकांच्या माध्यमातून उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेतून थेट संत्रा विक्री मंगळवार(ता. पाच) पासून सुरू झाली आहे.

Orange
Orange Processing : तासाला होणार पाच टन सत्र्यांवर प्रक्रिया

रिसोड येथील ग्राहकांपर्यंत यशस्वी विक्री नंतर वाशीम, अकोला, हैद्राबाद आदी ठिकाणी थेट विक्री करण्यात आली. आतापर्यंत सुमारे ५२ क्विंटल संत्रा थेट विक्री झाला. यातून दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम मिळाली.

ज्या संत्र्याला व्यापारी १० रुपये प्रती किलो घ्यायला तयार नव्हते त्या संत्र्याला ३० ते ५० रुपयांदरम्यान दर्जानुसार प्रतिकिलोचा दर मिळाला. यात सहभागी १५ ते २० संत्रा उत्पादकांना विक्री व्यवस्थापनाचे धडेसुद्धा मिळाले.

Orange
Orange Export Technique : संत्रा उत्पादकांनी जाणले निर्यात तंत्र

रिसोड येथील थेट विक्रीचा प्रारंभ केव्हीकेचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांच्या हस्ते झाला. नोंदणी केलेल्या ग्राहकांना घरपोच सुविधा देऊन विक्री सुरू झाली.

अकोला येथे विक्रीला ‘पंदेकृवि’चे कुलगुरू डॉ. शरद गडाख, डॉ. विलास खर्चे, डॉ. धनराज उंदीरवाडे, डॉ. एस. एस. माने, डॉ. प्रदीप नागरे, सुधीर राठोड, आत्मा संचालक डॉ. मुरलीधर इंगळे, निवृत्ती पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.

वाशीम येथे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या संकल्पनेतून ‘आत्मा’च्या वतीने आयोजित थेट संत्रा विक्री उपक्रमातूनही जिल्हा संघाने विक्री करण्यात आली.

जिल्हा संत्रा उत्पादक संघाच्या वतीने दीपक इडोळे, रवी इडोळे, राजकुमार देव्हळे, पंढरी जाधव, योगेश खानझोडे, पंकज करडे, मोबिन शाहा, कृष्णा मानवतकर, यांसीन शाहा, गोविंद देशमुख, गोपाल म्हातारमारे, अजय बोरकर, विठ्ठल जाधव, प्रवीण ठाकरे, दीपक कुटे, संजय राऊत आदी शेतकरी सहभागी झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com