Shaktipeeth Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’ला बार्शी तालुक्यातही विरोध

Farmer Agitation: बार्शी तालुक्यात शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीस शेतकऱ्यांचा तीव्र विरोध उफाळून आला असून पोलिसांनी काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याने वातावरण अधिकच तापले आहे. शेतकरी 'मोबदला नको, प्रकल्पच रद्द करा' अशी भूमिका घेऊन जोरदार घोषणाबाजी करत आहेत.

सुदर्शन सुतार

Solapur News: शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी तुळजापूर तालुक्याचे प्रांताधिकारी व तामलवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी व कर्मचारी असा फौजफाटा घेऊन बार्शी तालुक्यातील शेळगाव (आर) शिवारात व वाणेवाडी येथील शेतीची मोजणी करण्यासाठी दाखल झाले, परंतु याला बाधित शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध करण्यात आला. त्यानंतर पोलिस प्रशासनाने बळाचा वापर करत त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईवर शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात आक्षेप नोंदवला आहे.

या कारवाईवेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ‘एकच जिद्द शक्तिपीठ रद्द’ अशी घोषणाबाजी केली. यामुळे प्रशासनाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या वेळी शेतकऱ्यांनी वाढीव मोबदला नको, तर शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, अशी भूमिका मांडली. पोलिस प्रशासनाने बळाचा वापर करून गणेश घोडके, हनुमंत जाधव, अभिजित देशमुख, सुभाष जाधव, दिलीप शिरसाट, भीमाशंकर बादगुडे या शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.

जमीन मोजणी स्थळावरून शेतकरी हटण्यास तयार नसून त्यांचा विरोध कायम आहे. पोलिस प्रशासन अजून फौज मागवण्याच्या तयारीत असून प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यातील खुटेवाडी व वाणेवाडी परिसरांत तुळजापूरचे प्रांताधिकारी, तहसीलदार आणि तामलवाडी पोलिस स्थानकाचे अधिकारी व ३० पोलिस कर्मचारी जमीन मोजणीसाठी व रेखांकन करण्यासाठी आले होते. परंतु तेथेही शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांनी विरोध केला.

नागरिकांच्या तीव्र भावनांचा विचार करून शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, हीच या परिसरातील शेतकऱ्यांची सरकारला विनंती आहे.
सोमनाथ गायकवाड, बाधित शेतकरी, शेळगाव (आर.)
धाराशिव जिल्ह्यातील खुटेवाडी, वाणेवाडी येथील मोजणीला विरोध करत बुरूज राखला आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही आपली एकजूट वाढवावी. आपली जमीन राखावी. देशात लोकशाही आहे, जे संघटित आहेत, त्यांची जमीन, जीवन सुरक्षित आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संघटित व्हावे आणि आम्ही त्यासाठी पुढाकार घेऊ.
रविराज पाटील, बाधित शेतकरी, हत्तीज, ता. बार्शी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Marriage Problems: ग्रामीण भागातील लैंगिक कोंडमारा

Interview with IAS Varsha Ladda Untwal: मनुष्यबळाचा प्रश्‍न सोडविण्याला पहिले प्राधान्य

Agriculture Loan Waiver: शेतकऱ्यांची राजकीय ताकद उभी राहील का?

Wildlife Crop Damage Compensation: वन्यप्राण्यांमुळे पीक नुकसानीची भरपाई कशी मिळते?

Weekly Weather: हलक्या, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT