Jayakwadi Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Water Issue : ‘मुळा’तून ‘जायकवाडी’ला पाणी देण्यास विरोध

Shankarrao Gadakh on Jayakwadi : समन्यायी पाणीवाटपाच्या धोरणानुसार मुळा, तसेच नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीला पाणी देण्याबाबत झालेल्या निर्णयाला नगर जिल्ह्यातून विरोध होत आहे.

Team Agrowon

Nagar News : ‘‘समन्यायी पाणीवाटपाच्या धोरणानुसार मुळा, तसेच नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीला पाणी देण्याबाबत झालेल्या निर्णयाला नगर जिल्ह्यातून विरोध होत आहे. समन्यायी पाणी वाटप धोरणाला न्याय देण्याची गरज असताना सरकार यामध्ये दुजाभाव करीत आहे.

जायकवाडीला पाणी द्यायला विरोध केला जाईल,’’ असे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितले. ‘‘निळवंडे धरणात पाणी आहे. कालवे नाहीत. त्यामुळे त्यातील पाणी देण्याबाबत विचार व्हावा,’’ अशी भूमिका गडाख यांनी मांडली.

नगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा, तसेच नाशिक जिल्ह्यातील धरणातून समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार जायकवाडीला पाणी सोडण्याचे आदेश झाले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर घोडेगाव (ता. नेवासा) येथे आमदार शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करत शेतकऱ्यांनी पाणी देण्याला कडाडून विरोध केला. येथे शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

‘‘‘समन्यायी’चा कायदा सोलापूर जिल्ह्याला लागू होत असताना पुणे जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडण्याच्या नियोजनाकडे दुर्लक्ष केले जात आहे. येथे हिंमत चालत नसलेले मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याकरिता टाहो फोडत आहे,’’ असा आरोप गडाख यांनी केला. अतिवृष्टी, गारपिटीने झालेले कांद्याचे नुकसान व सध्याच्या दुष्काळजन्य स्थितीवर सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT