Aadhaar Enrollment Agrowon
ॲग्रो विशेष

Aadhaar Authentication : प्रोत्साहनपर लाभासाठी ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रामाणीकरणाची संधी

Deadline for Aadhaar : आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी महा-आयटी यांनी ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभास पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी महा-आयटी यांनी ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

या मुदतीत आधार प्रमाणिकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. मुकेश बारहाते यांनी केले.

या योजनेचा लाभ घेण्यास पात्र शेतकऱ्यांना त्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी ही अंतिम संधी आहे. आधार प्रमाणीकरणानंतरच पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना महा-आयटी मार्फत एसएमएस देण्यात आला आहे.

सर्व बँकांनीदेखील पात्र शेतकऱ्यांना याबाबत व्यक्तिश: कळविणे आवश्यक आहे. ७ सप्टेंबरनंतर आधार प्रमाणीकरणाची सुविधा बंद होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India Japan CBG initiative: ‘जपान-भारत बायोगॅस योजने’ची घोषणा

El Nino Impact: ‘एल निनो’चा पिकांवर होतोय जैवरासायनिक परिणाम

Water Crisis: पाण्यासारखा पैसा खर्च, तरी घशाला कोरड

Post Harvest Management: मिनिमल प्रोसेसिंग : शेतीमाल प्रक्रियेतील नवी संकल्पना

Maize MSP 2026 : इथेनॉलसाठी मक्याची हमीभावाने खरेदी करा; राजदचे खासदार सिंग यांचं पंतप्रधान मोदींना पत्र

SCROLL FOR NEXT