Drinking Water Issue in Villages: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील वाशेरे गावात शासनाने गेल्या सात वर्षांत पाण्यावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला, पण ग्रामस्थांची पाण्यासाठीची वणवण थांबलेली नाही. एकापाठोपाठ एक दोन मोठ्या योजना राबवूनही आज गावाला टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे, ही केवळ शोकांतिका नसून नियोजनशून्य कारभाराचा उत्तम नमुना आहे..सुरुवातीला राबवलेल्या योजनेनंतर, अधिक महत्त्वाकांक्षी अशा जलजीवन मिशन योजनेअंतर्गत थेट चासकमान धरणातून पाणी उचलण्याची योजना आखण्यात आली. त्यासाठी डोंगर पोखरून लांबच लांब जलवाहिनी टाकण्यात आली, धरणाजवळ विहीर खोदली आणि वीजजोडणीही केली..Dam Water Supply: पाणीकपातीतून अखेर सुटका.मात्र, डोंगर चढणीवरून पाणी खेचण्यासाठी आवश्यक वीजदाब आणि सक्षम विद्युत पंपांचा अभाव यामुळे ही योजना पूर्ण होऊनही निरुपयोगी ठरली आहे. कागदावर पूर्ण झालेली योजना प्रत्यक्षात एक थेंबही पाणी देऊ शकलेली नाही..Beed Water Crisis: बीड जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्पांत उपयुक्त पाणी नाही.दृष्टिक्षेपातएकूण खर्च (दोन योजना) : सव्वातीन कोटी रुपयेपहिली योजना (२०१९) : ६१ लाख रुपयेदुसरी योजना (जलजीवन मिशन) : सुमारे अडीच कोटी रुपयेनवीन जलवाहिनीची लांबी : सात किलोमीटरपाणीटंचाई : जानेवारी २०२६ पासून सुरू.योजनेचे काम पूर्णत्वास आले आहे; परंतु पाणी सुरू नाही. वीजपुरवठ्याची अडचण होती. आता जिल्हा वार्षिक नियोजनेतून यासाठी निधी मंजूर झाला आहे. वीज पुरवठ्याचे काम झाले की गावात पाणी पोचेल.वैभव बहिरट, शाखा अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.