Aadhar Linking : आधारकार्ड जोडायचे सांगत चार लाखांची फसवणूक

संजय माधवदास गुजराथी (वय ६०, रा. रमादेवी मंदिरामागे, भुतकरवाडी, सावेडी) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
aadhar link
aadhar linkAgrowon

Nagar News नगर ः बँक खात्याशी आधार कार्ड जोडणी (Aadhar Linking) करायचे आहे. त्यासाठी मोबाईलवर पाठविलेली लिंक (Mobile Link) ओपन करून त्यावर माहिती भरा, असा एक बनावट फोन एका व्यावसायिकाला आला.

त्या फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे व्यावसायिकाने लिंक ओपन करून माहिती भरली. त्यानंतर त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून तीन लाख ९९ हजार ५०० रुपये कपात झाले.

aadhar link
Aadhar : ‘आधार’ अभावी रखडला ६२ शेतकऱ्यांचा लाभ

संजय माधवदास गुजराथी (वय ६०, रा. रमादेवी मंदिरामागे, भुतकरवाडी, सावेडी) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. गुजराथी यांचे शहरातील लक्ष्मी कारंजा चौक या ठिकाणी सुयश इलेक्ट्रिकल नावाचे दुकान आहे.

aadhar link
PM Kisan : अपात्र लाभार्थ्यांकडून ‘पीएम किसान’ निधीची वसुली सुरू

त्यांच्या पत्नी संगीता यांच्या नावाने एचडीएफसी बँकेच्या लाल टाकी रस्त्यावरील शाखेत बचत खाते आहे. गुजराथी हे शुक्रवारी (ता. ३) सकाळी साडेआठ वाजता घरी असताना त्यांना त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला.

लिंक ओपन करून त्यामध्ये तुमची माहिती भरा, असे सांगितले गेले. त्यांनी फोनवर लिंक ओपन करून त्यामध्ये बँकेचा खाते क्रमांक व पासवर्ड टाकला. त्यावेळी पैसे काढून घेतल्याचा मेसेज आला. त्यांनी तत्काळ तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com