Aadhar Linking : आधारजोडणी, ई-केवायसीने शेतकरी त्रस्त

E-KYC Farmer : गेल्या वर्षी अतिवृष्टी झाल्याने शेती व पिकांचे अतोनात नुकसान झाले. शासकीय यंत्रणांनी पंचनामेही केले. मदतीची घोषणा होऊन बरेच दिवस लोटले. पण अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी नसल्याने नुकसान भरपाई मिळण्यात अडचण निर्माण होत आहे.
Aadhar Card
Aadhar CardAgrowon

Dharashiv News : ‘आधारसिडींग, ई-केवायसी‘ने जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. तर अनुदानाच्या यादीत भरमसाठ चुका असल्याने ‘नको ते अनुदान अन नको ते अर्थसाहाय्य असे म्हणण्याची वेळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. बँका तसेच सी-एससी सेंटरचे उंबरठे झिजविण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

Aadhar Card
Crop Damage Compensation : ई-केवायसी नसल्याने अवकाळीची नुकसानभरपाई मिळेना

‘ई-केवायसी, आधारसिडींग'' हे प्रकार शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. एका गावातील चार-पाच लोकांना अनुदान मिळतयं. उर्वरित १०० ते २०० शेतकरी अनुदानापासून वंचित राहतात. अन मग सुरू होते, उर्वरित शेतकऱ्यांची धावाधाव. वयाने साठी-सत्तरी गाठलेले शेतकरी सकाळी १० वाजल्यापासून सी-एससी सेंटरच्या दारात थांबतात. त्यातही साईट चालत नाही. पुरेसे नेट नाही. अशा तक्रारी सुरू होतात.

कसेतरी तास-दोन तासाने नंबर येतो. चार-पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर ई.-केवायसी होते. ते संपताच पुन्हा बँकेच्या दारात जायचे. तेथेही पैसे काढण्याची रांग असते. दिवसभर थांबून नंबर येतो. अन् अखेरच्या क्षणी समजते. इ.-केवायसी झालेच नाही.

पुन्हा ते थकलेले चेहरे सी-एससी सेंटरच्या दिशनेने निघतात. पुढे ते सेंटर बंद असते. दुसऱ्या दिवशी पुन्हा इ-केवायसी करण्याचा प्रयत्न केला जातो. अन पुन्हा बँकेचे दार पाहावे लागते. तीन-चार दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर कसे तरी अनुदानाचे तीन-चार हजार रुपये पदरात पडतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com