CBG plants Project: जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी गुरुवारी ‘भारत-जपान कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) उपक्रमा’ची घोषणा केली. शेण आणि इतर कृषी कचऱ्यापासून स्वच्छ ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ताकाइची यांच्यात सहमती झाली असून, सहकारी संस्थांच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येईल. .‘भारत-जपान संयुक्त आर्थिक मंचा’ला संबोधित करताना ताकाइची यांनी ही माहिती दिली. भारतातील ग्रामीण भागात उपलब्ध असलेले शेण, भाताचा पेंढा, उसाचे अवशेष आणि इतर कृषी कचरा यासारख्या मोठ्या प्रमाणावरील संसाधनांचा वापर करून कॉम्प्रेस्ड बायोगॅसची (सीबीजी) निर्मिती केली जाईल. ताकाइची म्हणाल्या की, ‘‘ग्रामीण भागातील ही संसाधने पूर्णपणे उपयोगात आणली गेलेली नाहीत.’’.CBG Policy 2026: ‘सीबीजी’ धोरणातून हरित ऊर्जेची झेप.पंतप्रधान मोदी यांनी ग्रामीण संसाधनांचे ऊर्जेत रूपांतर करण्याचे व्हिजन मांडले असून, सहकारी संस्थांच्या बळावर हे साध्य करणे शक्य आहे..India Japan Relation: जपानचा बूस्टर डोस.या सामायिक व्हिजनवर आधारित आम्ही ‘भारत-जपान सीबीजी उपक्रम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत २०३० पर्यंत संपूर्ण भारतात एक हजार बायोगॅस संयंत्रे (प्लँट्स) उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे..‘‘भारताच्या स्वच्छ ऊर्जा आणि ग्रामीण विकासाच्या उद्दिष्टांना यामुळे गती मिळेल. तसेच, या उपक्रमातून उत्पादित होणाऱ्या बायोगॅसवर चालणाऱ्या सुमारे २५ लाख सीएनजी वाहनांची बाजारपेठ निर्माण करण्यासाठी दोन्ही देश प्रयत्न करतील,’’ असे ताकाइची यांनी स्पष्ट केले. या संदर्भात उभय नेत्यांच्या भेटीनंतर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.