डॉ. सोनम काळे, डॉ. कुंदनसिंग जाधव
----------------------------------
Agricultural Biotechnology : महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठ (Agriculture University) आणि संलग्न अनुदानित व कायम स्वरूपी विना-अनुदानित कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात बीटेक (जैवतंत्रज्ञान) अभ्यासक्रम हा बारावीनंतर चार वर्षाचा आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील (Agriculture Sector) खासगी तसेच शासकीय क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
प्रवेश प्रक्रिया पात्रता ः
१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १०+२ पद्धतीनुसार इयत्ता १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा, भौ.र.ग. किंवा भौ.र.ग.जी. किंवा भौ.र.जी. आणि इंग्रजीसह उत्तीर्ण.
जीवशास्त्र, गणित हे विषय घेतले नसल्यास अशा उमेदवारास अपूर्तता भरून काढण्यासाठी संबंधित विद्यापीठाने विहित केलेले अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतील.
२) २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षातील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (PCB) किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित (PCM) या विषयातील MHT-CET /JEE / NEET सामाईक प्रवेश परीक्षाधारक असावा.
३) इयत्ता १२ वी मध्ये पीक उत्पादन, कृषी विज्ञान व तंत्रज्ञान, पशू विज्ञान, पशू विज्ञान आणि दुग्ध व्यवसाय, शेती यंत्रे / अवजारे, पीक शास्त्र, उद्यानविद्या इ. व्यावसायिक विषय असल्यास १० गुण जोडण्यात येतात.
४) विद्यार्थ्यांच्या पालकाकडे शेती असल्यास ७/१२ चा उतारा किंवा सक्षम प्राधिकरणाच्या भूमिहीन शेतमजुरच्या प्रमाणपत्र असल्यास १२ गुण जोडण्यात येतात.
जैव-तंत्रज्ञान अभ्यासक्रम ः
१) अभ्यासक्रम चार वर्षाचा असून, आठ सत्रांमधे विभागला आहे. यामध्ये सातव्या व आठव्या सत्रामध्ये READY (Rural Entrepreneurship Awareness Development Yojana) कार्यक्रमाचा समावेश आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बी टेक. (जैवतंत्रज्ञान) पदवी प्रदान करण्यात येते.
प्रमुख विभाग ः वनस्पती जैवतंत्रज्ञान, पशू जैवतंत्रज्ञान,सूक्ष्म जीवशास्त्र व पर्यावरण जैवतंत्रज्ञान, जैवसूचना विज्ञान.
वेबसाइट ः बी.टेक. (जैवतंत्रज्ञान) अभ्यासक्रमात ऑनलाइन प्रवेश नोंदविण्यासाठी व माहिती पुस्तिकेसाठी https://mhtcet२०२३.mahacet.org या संकेतस्थळावर भेट द्यावी.
तारीख ः९ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू असणार आहे.
रोजगाराच्या संधी ः
१) भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT)
२) एम. टेक. इन फार्मास्युटिकल जैवतंत्रज्ञान, अन्न जैवतंत्रज्ञान, मरिन जैवतंत्रज्ञान
३) इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे बायो-प्रोसेस टेक्नॉलॉजी.
४) राष्ट्रीय आणि राज्य संशोधन प्रयोगशाळा (IARI, ICMR, CSIR, BARC, CCMB) इत्यादी.
५) कृषी विद्यापीठ व संलग्न शासकीय/ खासगी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक.
६) केंद्राच्या (UPSC) व राज्याच्या कृषी विभाग (MPSC) आणि संबंधित परीक्षांसाठी पात्र.
७) बँकिंग क्षेत्र: सहकारी आणि राष्ट्रीयीकृत बँका
८) खासगी क्षेत्रातील बियाणे, कीटकनाशक, बुरशीनाशक, जैव खते कंपन्या.परदेशात नोकरीच्या संधी
९) वनस्पती उती संवर्धन प्रयोगशाळा, जैविक खते केंद्र, नर्सरी केंद्र, मशरूम उत्पादन केंद्र , कृषी सेवा केंद्र इत्यादी.
-----------------------
संपर्क ः डॉ. सोनम काळे, ९२८४०२२३३६
(सहाय्यक प्राध्यापक, महात्मा गांधी मिशन कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, गांधेली, छत्रपती संभाजीनगर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.