Soybean Procurement Process Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Buying Center : सांगली जिल्ह्यात ‘नाफेड’ची अवघी दोन सोयाबीन खरेदी केंद्रे सुरु

NAFED : केंद्रांवर सोयाबीनची विक्री करण्यासाठी अतिरिक्त खर्चाचा बोजा

Team Agrowon

Sangali News : सांगली ः जिल्ह्यात सन २०२४-२५ मध्ये आधारभूत दरानुसार नाफेडच्या वतीने सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यात विष्णूअण्णा खरेदी-विक्री संघ (सांगली) व ॲड. आर. आर. पाटील शेतकरी सह. खरेदी विक्री संघ (तासगाव) या दोन खरेदी केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी व खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे.

जिल्ह्यात दोन केंद्रे सुरू केल्याने या केंद्रावर सोयाबीनची विक्री करण्यासाठी अतिरिक्त खर्चाचा बोजा शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधारभूत दर मिळावा यासाठी नाफेडच्या वतीने सोयाबीन खरेदी केली जाणार आहे.

या हंगामातील सोयाबीनला किमान आधारभूत दर ४८९२ प्रति क्विंटल आहे. आधारभूत दराने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांनी एन.ई.एम.एल पोर्टलवर १२ जानेवारी २०२५ पर्यंत करायची आहे. त्यानंतरच शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर सोयाबीनची विक्री करता येणार आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात ३५ हजार ९५२ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन लागवड झाली होती.

वाळवा, पलूस, कडेगाव या तालुक्यांत सोयाबीनचे क्षेत्र जास्त आहे. यांसह अन्य तालुक्यात सोयाबीनची लागवड केली जाते. विष्णुअण्णा खरेदी विक्री संघ (सांगली) व ॲड. आर. आर. पाटील शेतकरी सह. खरेदी-विक्री संघ (तासगाव) या दोन केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी व खरेदी प्रक्रिया सुरू झाली झाली आहे.

परंतु या दोन केंद्रांना पलूस, कडेगाव, आटपाडी व खानापूर हे तालुके सोयाबीन खरेदीकरिता जोडले आहेत. मात्र, शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी चाळीस किलोमीटर ते साठ किलोमीटरवर यावे लागणार आहे. त्यामुळे वाहतुकीचा अतिरिक्त खर्चाचा बोजा शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणीही केली होती. परंतु, खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी कोणतीही संस्था पुढे येत नसल्याचे नाफेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अर्थात नाफेडही हमीभाव खरेदी केंद्र सरू करण्यासाठी फारशी तसदी घेत नसल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT