Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : विमा योजनेचा भार केवळ दोन कंपन्यांच्या खांद्यावर

Crop Insurance Scheme Maharashtra : एक रुपयातील विमा योजना बंद करण्याबरोबरच भरपाईच्या निकषातही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा यंदाच्या हंगामात योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे.

Team Agrowon

Yavatmal News : एक रुपयातील विमा योजना बंद करण्याबरोबरच भरपाईच्या निकषातही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा यंदाच्या हंगामात योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे.

त्यातच या वेळी राज्यभरात विमा योजनेचा भार केवळ दोन कंपन्यांच्या खांद्यावर टाकण्यात आला आहे. या सर्वांतून शासनाला काय साध्य करायचे आहे, असा सवाल शेतकरी संघटनेच्या कृषी विज्ञान व तंत्रज्ञान आघाडीचे प्रमुख मिलिंद दामले यांनी उपस्थित केला आहे.

यवतमाळसह इतर जिल्ह्यात यंदा राज्य व केंद्राचा विमा हप्त्यापोटीचा हिस्सादेखील पीकनिहाय राहणार आहे. जमा हप्त्याच्या तुलनेत ११० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले तर विमा कंपनी मूल्यांकन करून त्याआधारे विमा भरपाई देणार आहे. मागील सात वर्षांपैकी पाच वर्षांतील कमाल उत्पन्नाची सरासरी हा निकष त्यासाठी राहणार आहे.

विमा हप्त्यापैकी २० टक्‍के कंपनीला स्वतःकडे ठेवता येणार आहे. या पैशाचा विनियोग कर्मचारी पगार व इतर संसाधनावर होणाऱ्या खर्चासाठी करता येईल. १९ कंपन्यांनी टेंडर भरले. कमी किमतीची निविदा भरणाऱ्या भारतीय कृषी विमा कंपनीला १२ पैकी ९ जिल्हा समूहाचे कंत्राट मिळाले. लातूर-धाराशिव व बीड जिल्हा समूहांचे कंत्राट आयसीआयसीआय लोम्बार्डला मिळाले.

खरीप २०२३ ते रबी हंगाम २०२५-२६ या कालावधीत नऊ विमा कंपन्यांमार्फत योजना राबविली जात होती. आता सुधारित योजना केवळ दोन कंपन्यांच्या माध्यमातून राबविली जाणार आहे. यापूर्वी कंपन्या अधिक आणि त्यांच्याकडील मनुष्यबळदेखील पुरेसे होते. आता मात्र या कंपन्या योजनेची अंमलबजावणी, सर्व्हेक्षण व भरपाईची प्रक्रिया अपुऱ्या कर्मचारी बळावर कशा पार पाडतील.
- मिलिंद दामले, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, कृषी विज्ञान व तंत्रज्ञान आघाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: आले दरात सुधारणा; जिऱ्याचे भाव टिकून, कांद्यात काहीसे चढ उतार, गव्हाचे दर स्थिर, पपईची आवक कमीच

Agriculture Scheme: नांगर, रोटाव्हेटरसह १२ अवजारांसाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान; यांत्रिकीकरणाला सरकारकडून प्रोत्साहन

Brinjal Farming: दर्जेदार उत्पादनासाठी नियोजनबद्ध व्यवस्थापन

Soil Health: सांगलीतील जमिनीत सेंद्रिय कर्ब, नत्र यांची कमतरता

Agriculture Technology: भाजीपाला सुकविण्यासाठी यंत्रणा

SCROLL FOR NEXT