Sahyadri Farms  Agrowon
ॲग्रो विशेष

Sahyadri Farms : संघटित शक्तीच त्यांना समृद्धीकडे नेऊ शकते

Satish Magar : ‘सह्याद्री’कडे १९ हजार शेतकऱ्यांची संघटित शक्ती ही मोठी ताकद आहे. तुमची स्वत:ची एक अंतर्गत शिस्तबद्ध, दर्जेदार व्यवस्थापन यंत्रणा आहे.

Team Agrowon

Nashik News : ‘‘उद्योजकीय दृष्टिकोन खूप आवश्‍यक आहे. तो नसेल तर कोणत्याही व्यवसायाची वाताहात होते. काळाची पावले ओळखून स्वत:ला बदलणे गरजेचे असते. ‘सह्याद्री’च्या शेतकऱ्यांनी त्या दिशेने पाऊल टाकले आहे, हे कौतुकास्पद आहे,’’ असे प्रतिपादन ‘मगरपट्टा सिटी ग्रुप ऑफ कंपनीज’चे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर यांनी केले.

मोहाडी (ता. दिंडोरी) येथील ‘सह्याद्री फार्म्स''च्या प्रांगणात मंगळवारी (ता. २६) ‘सह्याद्री फार्म्स’ची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या वेळी ‘मगर पट्टा सिटी-शेतकऱ्यांच्या शाश्‍वत समृद्धीचा संघटित प्रवास’ या विषयावर मगर यांनी मार्गदर्शन केले. ‘सह्याद्री फार्म्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, संचालक डॉ. क्षमा फर्नांडिस, अजहर तांबुवाला, कैलास माळोदे, रामदास पाटील, आदी उपस्थित होते.

मगर म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांची सामूहिक शक्ती एकत्र आली, की काय चमत्कार होऊ शकतो, याचे ‘सह्याद्री’ एक उदाहरण आहे. ‘सह्याद्री’कडे १९ हजार शेतकऱ्यांची संघटित शक्ती ही मोठी ताकद आहे. तुमची स्वत:ची एक अंतर्गत शिस्तबद्ध, दर्जेदार व्यवस्थापन यंत्रणा आहे. अनावश्‍यक राजकारणापासून तुम्ही कोसो दूर आहात. हाच तुमचा सगळ्यात मोठा गुण आहे. या फायद्याचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा.

जे जगात कुणी केले नाही ते ‘सह्याद्री’च्या शेतकऱ्यांनी करून दाखविले आहे. तुम्ही इतके करू शकला आहात, तर तुम्ही अजून खूप काही करू शकता, यावर विश्‍वास ठेवा. पुढच्या अनेक पिढ्यांसाठी मार्ग तयार झाला आहे. ‘सह्याद्री’मध्ये स्त्रिया मोठ्या संख्येने सभासद आहेत, हे विशेष कौतुकास्पद आहे.

जोपर्यंत घर सक्षम होत नाही, तोपर्यंत समाज सक्षम होत नाही.’’ श्री. शिंदे यांनी प्रास्ताविकात ‘सह्याद्री फार्म्स’च्या मागील १२ वर्षांतील वाटचालीचा आलेख मांडला. ते म्हणाले, ‘‘शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून प्रारंभ करताना अनेक आव्हानांतून जावे लागले. मात्र मागील १२ वर्षे एक स्पष्ट दिशा ठेवून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून ‘सह्याद्री’ची ओळख बनत गेली. त्यातूनच ‘सह्याद्री’ने २०२२-२३ अखेर वार्षिक उलाढालीचा १ हजार ७ कोटींचा पल्ला गाठला आहे.’’

...हे ठरले ‘सह्याद्री फार्मर ऑफ द इयर’

‘सह्याद्री फार्म्स‘तर्फे दरवर्षी उत्कृष्ट उत्पादन घेणाऱ्या शेतकरी सभासदास एक लाख रुपये धनादेशासह ‘सह्याद्री फार्मर ऑफ द ईयर’पुरस्काराने सन्मानित केले जाते. या वर्षी हा पुरस्कार कुर्णोली येथील यादव संधान, शंकर संधान व विंचूर गवळी येथील नर्मदाबाई गवळी, विलास गवळी यांना प्रदान करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT