Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : मांगी तलावात उरले केवळ एक टक्का पाणी

Water Shortage : करमाळा तालुक्यातील मांगी तलावातील अनधिकृत बेसुमार पाणी उपसा सुरूच असल्याने तलावात केवळ एक टक्का पाणी शिल्लक राहिले आहे.

Team Agrowon

Solapur News : करमाळा तालुक्यातील मांगी तलावातील अनधिकृत बेसुमार पाणी उपसा सुरूच असल्याने तलावात केवळ एक टक्का पाणी शिल्लक राहिले आहे. त्यामुळे तलावातील पंधरा टक्के आरक्षित पाणी कागदावरच राहिले आहे.

परिणामी, येत्या आठ-दहा दिवसात तलाव कोरडाठाक होण्याची शक्यता असून, त्याचा फटका परिसरातील पाण्याच्या स्त्रोतावर होणार आहेच, पण वन्यप्राण्यांनांही त्याचा फटका बसणार आहे.

मांगी तलाव हा करमाळा तालुक्यातील उत्तर भागाला वरदान आहे. दुष्काळी स्थितीत या तलावातील पाण्यावर येथील नागरिकांचे व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, म्हणून तलावातील पंधरा टक्के पाणी आरक्षित करण्यात आले आहे. तलावावर बोरगाव प्राधिकरणासह अनेक योजना कार्यान्वित आहेत.

शिवाय या भागात कामोणे येथे अभयारण्य असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी तलावात पाणी पिण्यासाठी येतात. त्यामुळे तलावात १५ टक्के पाणी राहिले की कॅनलद्वारे पाणी सोडणे बंद केले जाते. यावर्षी दुष्काळी स्थिती असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाटबंधारे विभागाला आरक्षित पाणी ठेवण्यासंदर्भात पत्रही देण्यात आले.

मात्र पाटबंधारे विभागाकडून या आदेशाला केराची टोपली मिळाली असून केवळ वीज वितरणला वीज कनेक्शन तोडण्यासाठी पत्र दिले असे सांगून कागदी घोडे रंगविण्यात आले आहेत. त्यामुळे तलावावर दोन्ही बाजूनी बेसुमार पाणी उपसा सुरूच असून, तलावात केवळ एक टक्का पाणी शिल्लक राहिले आहे.

अशा स्थितीतही पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केले तर काही दिवसात तलाव कोरडाठाक होणारा असून, येथील नागरिकांबरोबरच वन्य प्राण्यांचे पाण्यासाठी मात्र मोठे हाल होणार आहेत.

तलावातील पाण्यावर आमचे लक्ष असून, तलाव परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यासाठी वीज वितरणला लेखी कळविले आहे. त्यामुळे अनधिकृत पाणी उपसा थांबेल.
- ऋशिकेश बागडे, कनिष्ठ अभियंता पाटबंधारे विभाग, करमाळा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jayakwadi Dam Water Release: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा, जायकवाडीतून ५ नोव्हेंबरपासून रब्बीतील पहिले आवर्तन

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरमध्ये ४३ हजार शेतकऱ्यांची कोंडी! कर्जमुक्तीची प्रतीक्षा कधी संपणार?

Farmer Loan Waiver : कर्जमाफीचा लाभ आत्तापर्यंत किती पात्र शेतकऱ्यांना मिळाला?

Strawberry Center Ware : थेट शेतातून ग्राहकांच्या हाती! वारे येथे स्वतंत्र स्ट्रॉबेरी केंद्राचे उद्घाटन, पर्यटकांची गर्दी

Farmer Issue: आधार प्रमाणीकरणानंतरही कर्जमुक्ती नाही

SCROLL FOR NEXT