Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Water Stock : उन्हाळ्या आधीच उजनी कोरडं पडण्याची शक्यता ; धरणात अवघा ९ टक्के पाणीसाठी

Ujani Dam Water Storage : पुणे आणि सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायनी ठरलेल्या उजनी धरणाची यंदा अतिशय बिकट अवस्था झाली आहे. कमी पाऊसमान आणि ढिसाळ नियोजनामुळे पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक पातळीवर आली आहे.

Mahesh Gaikwad

Pune News : पुणे आणि सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायनी ठरलेल्या उजनी धरणाची यंदा अतिशय बिकट अवस्था झाली आहे. कमी पाऊसमान आणि ढिसाळ नियोजनामुळे पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक पातळीवर आली आहे.

सध्या धरणातील पाणीसाठा अवघ्या ९ टक्क्यांवर आला आहे. त्यातच येत्या सहा महिन्यांत नदी, कालवा, पाणी योजनांव्दारे तीन आवर्तने सोलापूर जिल्ह्याला देणे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यापूर्वीच धरण कोरडे पडण्याची शक्यता आहे.

सध्या उजनी धरणातून सोलापूर महापालिकेसह , पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा नगरपालिकेला पिण्यासाठी ५ हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे. सध्याची धरणातील पाणीसाठ्याची स्थिती पाहता येणाऱ्या काळात पाणी टंचाईचे संकट गडद होण्याची चिन्हे आहे.

गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात १०० टक्के पाणीसाठा असलेल्या धरणात यंदा केवळ ९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. सोलापूरसाठी धरणातून ५ टीएमसी पाणी सोडावे लागते. हे पाणी सोलापूरकरांना केवळ ५० दिवस पुरणार आहे. याशिवाय मार्च आणि मे महिन्यातही दोन आवर्तानाच्या माध्यमातून १० ते १२ टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे.

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदा एल निनो किंवा सुपर एल निनोचा फटका बसल्यास जुलै महिन्यातही पाण्याची गरज भागविण्यासाठी आवर्तन सोडावे लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात धरणाच्या मृत साठ्यातून पाणी सोडण्याची वेळ येणार आहे.

रब्बीसाठी पाणी सोडण्याची मागणी

दरम्यान, आधीच खरीप हंगाम हातातून गेल्यामुळे शेतकऱ्यांची सर्व भीस्त रब्बी हंगामावर आहे. यंदा कमी पाऊसमानामुळे उजनीतील पाणीसाठ्याची स्थिती बिकट झाली आहे. अशातच आता रब्बीसाठी धरणातून दुसरे आवर्तन सोडण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT