Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांत अवघा ३६ टक्के पाणीसाठा

Water Shortage : म्हैसाळ, ताकारी आणि टेंभू या सिंचन योजना सुरू होत्या, त्यामुळे या भागातील तलाव पाण्याने भरल्याने पाणीसाठ्यात १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांची संख्या ८३ आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात याच प्रकल्पात २४ टक्के इतका पाणीसाठा होता. म्हैसाळ, ताकारी आणि टेंभू या सिंचन योजना सुरू होत्या, त्यामुळे या भागातील तलाव पाण्याने भरल्याने पाणीसाठ्यात १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये मिळून ८३ मध्यम आणि लघु प्रकल्प आहेत. जत, कवठेमहांकाळ आणि आटपाडी या दुष्काळी तालुक्यांत त्यांची संख्या अधिक आहे. या तीनही तालुक्यांतील प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा खूपच कमी आहे. तासगाव तालुक्यातही पाणीसाठा कमी आहे.

जिल्ह्यातील सर्व ८३ तलावांमध्ये मागील वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ८८ टक्के पाणीसाठा होता. मात्र, गतवर्षीच्या तुनलेत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ५२ टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे. ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाच्या असणाऱ्या मध्यम व लघु प्रकल्पातील तलावांत या योजनांचे पाणी सोडण्यात आले होते.

त्यामुळे तलावांतील पाणीपातळी वाढण्यास मदत झाली आहे. परंतु गेल्या महिन्याच्या तुलनेत १२ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला असला तरी पाणी टंचाई दूर झाली नसल्याचे चित्र आहे. पाटबंधारे विभागाने तयार केलेल्या पाणीसाठा अहवालात सध्या ३ मध्यम प्रकल्प व २८ लघु प्रकल्पांत ३६ टक्के पाणीसाठा असल्याची नोंद केली आहे. अर्थात ५२ प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे.

प्रकल्प प्रकार प्रकल्प संख्या पाणीसाठा (टक्के)

मध्यम ५ ३४

लघु ७५ ३७

एकूण ८३ ३६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT