Agriculture Loan  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Crop Loan : राष्ट्रीय बँकांचे ३० टक्केच पीककर्ज वाटप

Crop Loan Distribution : पीककर्ज वाटपासाठी प्रशासनाकडून बँकांना दोन हजार दोनशे कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत ९७ हजार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.

Team Agrowon

Yavatmal News : पीककर्ज वाटपासाठी प्रशासनाकडून बँकांना दोन हजार दोनशे कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत ९७ हजार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. पीककर्ज वाटपाचा आकडा एक हजार कोटींच्या पुढे सरकला आहे.

राष्ट्रीय बँकांचे पीककर्ज वाटप करताना अडवणुकीचे धोरण कायम आहे. खरिपातील पेरणी सुरू झाली आहे. राष्ट्रीय बँका कासवगतीने पीककर्ज वाटप करीत आहेत. आतापर्यंत ४६.५७ टक्के पीककर्जाचे वाटप झाले आहे. त्यातही जिल्हा बँकेने ७२ टक्के पीककर्ज वाटप केल्याने पीककर्ज वाटपाची टक्केवारी वाढली आहे.

राष्ट्रीय बँकांची कामगिरी नेहमीप्रमाणे संथच आहे. राष्ट्रीय बँका अजूनही २९.५६ टक्क्यांवर अडून आहेत. वेळेवर धावपळ होऊ नये, म्हणून शेतकरी पीककर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, त्यांना विविध कारणे दाखवून परत पाठविले जात आहे. राष्ट्रीय बँकांत सर्वाधिक त्रुटी काढल्या जात असल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे.

२०२४-२५ खरीप हंगामासाठी राष्ट्रीय बँकांसह जिल्हा बँकांना दोन हजार २०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले. आतापर्यंत ९७ हजार ४९६ शेतकऱ्यांना एक हजार २४६ कोटी रुपयांचे पीककर्जाचे वाटप झाले आहे. जिल्हा बँकेने उद्दीष्टांच्या ७२ टक्के म्हणजे ५७ हजार ७१७ सभासदांना पाचशे कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे.

राष्ट्रीय बँकांनी केवळ २७ हजार ७१० सभासदांना ३५५ कोटी ८८ लाख रुपयांचे पीककर्ज दिले आहे. ज्या बँकेत शेतकऱ्यांचे खाते आहे. त्यांना वेळेत पीककर्ज देण्याचे निर्देश आहेत. प्रत्यक्षात कर्जासाठी आलेल्या शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे.

निसर्गाचा लहरीपणा, दुबार पेरणी, नापिकी, सावकारी कर्ज, फवारणीचा फास, फसवी ठरलेली कर्जमाफी, शासनाच्या मदतीची पोकळ घोषणा, यामुळे शेतकरी देशोधडीला लागले आहेत. त्यात कोणताच हंगाम शेतकऱ्याला साथ देताना दिसत नाही. घाम गाळून पिकविलेल्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. लागवडीचा खर्च निघत नसल्याने शेती व्यवसाय तोट्याचा ठरत आहे. निराशेच्या गर्तेत सापडलेले शेतकरी यंदातरी उत्पन्न होईल, या एकमेव आशेने खरिपात राबत आहे.

बँक सभासद रक्कम (कोटींत) टक्के

राष्ट्रीय २७,७१० ३५५ २९.५६

खासगी बँका १३४९ २० कोटी ६१ लाख १५.१९

विदर्भ कोकण १०,७२० १४ कोटी ८९.५१

जिल्हा मध्यवर्ती ५७,७१७ ५०३ कोटी ७२.०४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

Sangli Vidhansabha Election : सांगलीत भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; आर. आर. आबांच्या मुलाने वादळात दिवा लावला

Lumpy Skin Disease : दिघंचीमध्ये ‘लम्पी’चा विळखा

Agrowon Podcast : कांदा बाजारभाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत गहू दर?

SCROLL FOR NEXT