Crop Loan Distribution : अकोल्यात खरिपासाठी पीककर्ज वाटप संथगतीने

Disbursement of Crop Loans is Slow in Akola Maharashtra : यंदाच्या खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होत आहे. या हंगामासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज मिळावे यासाठी १३०० कोटींचा लक्ष्यांक देण्यात आला आहे. मात्र, २५ मे अखेर जिल्ह्यात ५० टक्क्यांच्या आत म्हणजेच अवघे ६२० कोटींचे पीककर्ज वाटप झालेले आहे.
Crop loan distribution slow
Crop loan distribution slowAgrowon
Published on
Updated on

Akola News : यंदाच्या खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होत आहे. या हंगामासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज मिळावे यासाठी १३०० कोटींचा लक्ष्यांक देण्यात आला आहे. मात्र, २५ मे अखेर जिल्ह्यात ५० टक्क्यांच्या आत म्हणजेच अवघे ६२० कोटींचे पीककर्ज वाटप झालेले आहे.

यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्वाधिक ४५८ कोटींच्या वाटपाचा वाटा आहे. इतर बँकांची कामगिरी फारशी समाधानकारक नसून जिल्हा प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केल्या जात आहे.

या खरीप हंगामासाठी १ लाख ३६ हजार ७७५ खातेदार शेतकऱ्यांना १३०० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले जाणार आहे. एक एप्रिलपासून कागदोपत्री वाटपाला सुरुवातही झालेली आहे. म्हणजेच दोन महिन्यांचा काळ पूर्ण झाला. या काळात अवघे ५० टक्क्यांपर्यंतही पीककर्ज वाटप पोहोचलेले नाही.

Crop loan distribution slow
Crop Loan Distribution : खरीप हंगामासाठी ९१३ कोटींचे पीककर्ज वाटप

५८ हजार ८३८ शेतकऱ्यांना ६२० कोटी रुपयांचे पीककर्ज देण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी बी-बियाणे, खतांची खरेदी तसेच मशागतीला शेतकऱ्यांना पैशांची निकड भासते. मात्र, बँकांकडून पीककर्ज वाटपाला गती दिलेली नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता यावर्षात खरीप नियोजनात बाधा ठरलेली आहे.

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या बैठकी यावेळी रद्द झाल्या. अधिकाऱ्यांनी बैठका घेऊन नियोजन केले. लोकप्रतिनिधी प्रचारात अडकल्याने व नंतर आचारसंहितेमुळे हस्तक्षेप करता येत नसल्याने कोणीही या मुद्याकडे फारसे गांभिर्याने लक्ष दिलेले नाही.

Crop loan distribution slow
Crop Loan Distribution : तीन हजार कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

बँक शेतकरी खातेदार रक्कम टक्के

राष्ट्रीयीकृत ७२१९ ८१ कोटी ३५ लाख १६.७४

खासगी ४९१ ६ कोटी ८३ लाख २०.०९

विदर्भ ग्रामीण ६०४२ ७३ कोटी ३ ४लाख ४८.८९

जिल्हा बँक ४५०८६ ४५८ कोटी ४९ लाख ७२.७८

एकूण ५८८३८ ६२० कोटी ४७.६९

शेतकऱ्यांना हंगामासाठी पीककर्जाची गरज राहते. यंदा भाव न मिळाल्याने शेतकरी आधीच अडचणीत सापडलेला आहे. शिवाय पीककर्ज देताना बँका वाढीव टक्क्याने देत नाहीत. जुन्या कर्जाऐवढीच रक्कम देत आहेत. वरिष्ठांनी या बाबींकडे गांभिर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना पीककर्ज वेळेत कसे मिळेल याची उपाययोजना करणे आवश्यक झालेले आहे. अन्यथा शेतकऱ्याला पेरणीसाठी सावकाराच्या दारात जाण्याशिवाय पर्याय नाही.
विलास ताथोड, अध्यक्ष, सोशल मीडिया विभाग, शेतकरी संघटना, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com