Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : सांगलीत २८ टक्केच पाणीसाठा

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यातील ८३ प्रकल्पांमध्ये केवळ २८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. १७ तलाव कोरडे पडले आहेत. तर ११ तलावांमध्ये मृतसाठा आहे. गतवर्षी याच वेळी ६६ टक्के पाणीसाठा होता.

तो २८ टक्क्यांवर आला असल्याने तब्बल ३८ टक्के पाणीसाठ्याची तूट यावर्षी आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जत आणि आटपाडी तालुक्यांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

जिल्ह्यात एकूण ८३ मध्यम, लघू प्रकल्प आहे. त्यामध्ये ५ मध्यम प्रकल्प, तर ७८ लघू प्रकल्पांचा समावेश आहे.

सद्यःस्थितीत यामध्ये २८ टक्के पाणीसाठा आहे. तासगाव, जत, कवठेमहांकाळ तालुक्यात पाणीटंचाईची गंभीर स्थिती आहे. तासगाव, जत तालुक्यांत १८ टक्के, तर खानापूर आणि कवठेमहांकाळ तालुक्यांत १९ टक्के पाणीसाठा आहे.

दरम्यान, डिसेंबर जिल्ह्यातील ८३ मध्यम व लघू प्रकल्पात महिन्यात २३ टक्के पाणीसाठा होता. तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात २५३८ दशलक्ष घनफूट म्हणजे ३३ टक्के इतका पाणीसाठा होता. जानेवारी महिन्यात पाणीसाठ्यात १० टक्क्यांनी वाढ झाली होती. मात्र उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे.

त्यामुळे पुन्हा पाणीसाठा कमी झाला आहे. जानेवारी महिन्यातील पाणीसाठ्याच्या तुलनेत फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पाच टक्क्यांनी पाणीसाठा घटला आहे. पावसाचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यातही टंचाई आहे.

मागील वर्षी या वेळची स्थिती

मागील वर्षी याच कालावधीत ८३ प्रकल्पांमध्ये ६५ टक्के इतका पाणीसाठा होता. त्यामध्ये तासगाव तालुक्यात ७६ टक्के, खानापूर ६२ टक्के, कडेगाव ५२ टक्के, शिराळा ६० टक्के,

आटपाडी ८१ टक्के, जत ६२ टक्के, कवठेमहांकाळ ७५ टक्के, मिरज ५२ टक्के, वाळवा तालुक्यात ४५ टक्के पाणीसाठा होता. विशेष म्हणजे गतवर्षी जत तालुक्यात ६२ टक्के पाणीसाठा होता. तो यंदा १८ टक्के आहे.

५० गावांना ५३ टँकरने पाणीपुरवठा

जत तालुक्यातील ४६ आणि आटपाडी तालुक्यातील ४ अशा एकूण ५० गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जत तालुक्याला ५०, तर आटपाडी तालुक्याला ३ टँकर सुरू आहेत. टँकर सुरू असलेल्या गावांमध्ये जत तालुक्यातील निगडी खु., शेड्याळ, सिंदूर, पांढरेवाडी, वळसंग, एकुंडी, हळ्ळी, बसर्गी, सोन्याळ, सालेगिरी-पाच्छापूर, कुडनूर, वायफळ,

गुगवाड, गिरगाव, संख, जाडरबोबलाद, काराजनगी, उमराणी, तिकोंडी, बेळोंडगी, मोकाशेवाडी-टोणेवाडी, माडग्याळ, सोनलगी, मुचंडी, जालीहाळ खु, कागनरी, दरीबडची, कोळगिरी, को. बोबलाद, लमाणतांडा, केरेवाडी, तर आटपाडी तालुक्यातील आंबेवाडी, पुजारवाडी, विठलापूर व उंबरगाव आदी गावांचा समावेश आहे.

प्रकल्प आणि आजचा पाणीसाठा (दशलक्ष घनफूट)

तालुका प्रकल्प संख्या उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी

तासगाव ७ १०४.१७ १८

खानापूर ८ १०१.५६ १९

कडेगाव ७ २९१.८२.४६

शिराळा ५ ४०६.५० ४६

आटपाडी १३ ५६४ ४९

जत २७ ५२९.१२ १८

कवठेमहांकाळ ११ १५९.६४ १९

मिरज ३ ३०.२६ २५

वाळवा २ १०.९१ २३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT