Crop Insurance agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : शेतकऱ्यांचा संताप, विमा भरलेल्याना फक्त २५% अग्रीम रक्कम

sandeep Shirguppe

Solapur Farmers Crop Loan : सोलापूर जिल्ह्यात गतवर्षीच्या दुष्काळी परिस्थितीत मंगळवेढा तालुक्यातील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक दुष्काळाच्या झळा या तालुक्याला बसल्या. तालुक्यातील ५ महसूल मंडलातील शेतकऱ्यांना पिकांचा विमा भरला होता, विमा भरलेल्या शेतकऱ्यांना फक्त २५% अग्रीम देऊन बोळवण करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.

उर्वरित ७५ % रक्कम देण्यासाठी विमा कंपनीने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांतून कंपनीच्या कारभाराबद्दल संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

गतवर्षीच्या खरीप हंगामात आठ मंडलमधील ५२ हजार शेतकऱ्यांनी ६८ हजार हेक्टरवर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे विमा भरला. दुष्काळी परिस्थितीत विमा कंपनीने सुरुवातीला फक्त दोन महसूल मंडलला अग्रीम देण्याचा निर्णय घेतला. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

तर आ. समाधान अवताडे यांनी जिल्हा नियोजन मंडळच्या बैठकीमध्ये सर्वच मंडलचा समावेश करावा अशी मागणी केल्यानंतर आंधळगाव, हुलजंती, मारापूर, मंगळवेढा, पाटखळ मंडलमधील शेतकऱ्यांना बाजरी, मका पिकाला अग्रीम देण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये मरवडे, भोसे बोराळे मंडल वगळण्यात आले आहे.

पाच मंडलात २५ टक्के अग्रीम विमा दिला होता मात्र उर्वरित ७५ टक्के रक्कम विमा कंपनीने दिलेच नसल्याने शेतकऱ्यांना आर्थीक नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे संपूर्ण पिकाचे नुकसान झाले असताना विमा कंपनीने फक्त २५ टक्के रक्कम देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रयत्न करताना तुर पिकदेखील अग्रीममधून वगळण्यात आले.

चुकीचे निकष लावून शेतकऱ्याला विमा

मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळ जाहीर झाला असताना इतर मंडलमध्ये दुष्काळाने पिकांचे नुकसान झाल्याची तक्रार ७२ तासाच्या आत तक्रार केली. परंतु या तक्रारीची विमा कंपनीने शहनिशा न करता थेट निकाली काढत भरपाई पासून वंचित ठेवल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

चुकीचे निकष लावून शेतकऱ्याला विमा देण्यास कंपनी टाळाटाळ करते. प्रत्येक वेळेला तालुक्यातील शेतकऱ्याकडून आंदोलनाची वाट विमा कंपनी का बघते.शासनाने दुष्काळ निश्चित केल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट विमा भरपाई दिल्यास खरीप हंगामात पेरणी व बियाणासाठी उपयोगी पडतील, निकाली काढलेल्या तक्रारी ग्राह्य धराव्यात अन्यथा आंदोलन करावे लागेल अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan and Namo Yojana : 'पीएम किसान’चा १८ वा आणि ‘नमो’चा पाचवा हप्ता खात्यात जमा

Congress questions on Modi's visit : राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी जीवन संपवले, भाजपने काय केलं? काँग्रेसचा मोदींना सवाल

Organic Pesticide : जैविक कीटकनाशक ‘मेटाऱ्हायझियम’

Makhana Benefits : मखनाचे आरोग्यदायी फायदे

Rahul Gandhi : राहुल गांधीचा भाजपवर हल्लाबोल, कोल्हापुरात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

SCROLL FOR NEXT