Jalna News : भोकरदन तालुक्यातील बाणेगाव येथील लघू प्रकल्पात जून अखेरीस दहा टक्के पाणी साठा झाला आहे. दरम्यान लघू प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असली तरी या प्रकल्पातून जाणाऱ्या डाव्या आणि उजव्या कालव्याचे काम अपूर्ण आहे.
परिणामी या प्रकल्पातील पाणीसाठा शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी येत नसून लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने प्रकल्प २०१२ मध्ये भरला होता. तसेच गेल्यावर्षी पाऊस चांगला न झाल्याने पाणीसाठा झालाच नव्हता.
यातच टंचाईमुळे प्रशासनाकडून बाणेगाव येथील लघू प्रकल्पातून तालुक्यासाठी शंभर टँकर सुरू करण्यात आले होते. यातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा झाला. परिणामी प्रकल्पात मृतसाठा शिल्लक राहिला होता.
दरम्यान प्रकल्प कोरडा पडल्याने त्यातून गाळ उपसा करण्यात आला. परंतु या तलावातील गाळाचे पूर्ण क्षमतेने उपसा न झाल्याने खोलीकरण पहिजे त्या प्रमाणात झाले नाही. यंदाच्या पावसाळ्यात या प्रकल्पात जेमतेम दहा टक्के पाणी साठा झाला आहे.
यामुळे येथून पाणीपुरवठा होणाऱ्या गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या काळात या प्रकल्पातील दोन्ही कालव्यांचे काम मार्गी लागल्यास शेतकऱ्यांना प्रकल्पाचा मोठा फायदा होऊन हजारो हेक्टर जमिनी सिंचनाखाली येतील. प्रशासनाने याची दखल घेत कालव्यांचे काम पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.