Agriculture Sowing : बीडमध्ये ७८ टक्के पेरणी आटोपली

Sowing Update : बीड जिल्ह्यात २४ जून अखेरपर्यंत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७८ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे.
Agriculture Sowing
Agriculture SowingAgrowon
Published on
Updated on

Beed News : बीड जिल्ह्यात २४ जून अखेरपर्यंत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७८ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. या पेरणीत सोयाबीनची सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १२४ टक्के क्षेत्रावर, तर कपाशीची सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत आतापर्यंत ६६ टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे.

यंदा बीड जिल्ह्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ५५ हजार ४९४ हेक्टर प्रस्तावित करण्यात आले आहे. त्या क्षेत्राच्या तुलनेत २ लाख ३२ हजार ८८६ हेक्टर म्हणजे ६६ टक्के क्षेत्रावर कपाशी लागवड आटोपली आहे. दुसरीकडे सोयाबीनची प्रस्तावित २ लाख २६ हजार २३४ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २ लाख ७९ हजार ८८८ हेक्टर म्हणजे १२४ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे.

Agriculture Sowing
Agriculture Sowing : परभणीत २५.५९ टक्के, तर हिंगोलीत ३२.३० टक्के पेरणी

जिल्ह्यात यंदा खरिपाच्या प्रस्तावित ७ लाख ८५ हजार ७८६ हेक्टर क्षेत्रापैकी ६ लाख १३ हजार ९८३ हेक्‍टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७८.१ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी आटोपली आहे. त्यामध्ये बीड तालुक्यात १ लाख १९ हजार ९७५ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले. आतापर्यंत या प्रस्तावित क्षेत्रापैकी १ लाख १ हजार २७३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ४४ टक्के आहे.

पाटोदा तालुक्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या ५६ हजार ८६५ हेक्टर क्षेत्रापैकी ३२३६८ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ५७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. आष्टी तालुक्यात प्रस्तावित ९३ हजार ८ हेक्टर क्षेत्रापैकी ६० हजार ७०१ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६५ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे.

शिरूर तालुक्यात प्रस्तावित ५०७२९ हेक्टर क्षेत्रापैकी ४० हजार ९७९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८१ टक्के पेरणी झाली आहे. माजलगाव तालुक्यात प्रस्तावित ६८,७१३ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४५ हजार ६४० हेक्टरवर म्हणजे ६६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

Agriculture Sowing
Kharif Sowing : बारामतीच्या जिरायती भागात खरीप पेरणीच्या कामांना वेग

गेवराई तालुक्यात प्रस्तावित १ लाख ६ हजार ३६७ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ९१ हजार ३४२ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. धारूर तालुक्यात प्रस्तावित ४११८२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २६२५९ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत सर्वांत कमी ६४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

वडवणी तालुक्यात प्रस्तावित २९ हजार ९९५ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २११९६ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

अंबाजोगाई तालुक्यात प्रस्तावित ६९,५२० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ६२ हजार २५६ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

केज तालुक्यात प्रस्तावित ९२,१८२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ७८ हजार २९८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८५ टक्के इतकी आहे.

परळी तालुक्यात प्रस्तावित ५७,२५० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ५२ हजार

६७१ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत जिल्ह्यात सर्वाधिक ९२ टक्के क्षेत्रावर खरीप पेरणी आटोपली आहे.

लवकर पेरण्या झाल्या. बीजप्रक्रिया मोठ्या प्रमाणावर झाली. बीबीएफ क्षेत्र वाढते आहे. बियाणे विक्री होऊन ही २०-३० टक्के बियाणे शिल्लक आहे.
बाबासाहेब जेजुरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com