Onion Agrowon
ॲग्रो विशेष

New Onion Variety : ८५ दिवसांत तयार होणाऱ्या कांद्याचा नवीन वाण विकसित

Onion Farming : राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान (एनएचआरडीएफ) या संस्थेने आजवर खरीप, लेट खरीप व रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याचे विविध वाण विकसित केले आहेत.

मुकुंद पिंगळे

Nashik News : राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान (एनएचआरडीएफ) या संस्थेने आजवर खरीप, लेट खरीप व रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याचे विविध वाण विकसित केले आहेत. उत्पादकता व रंग ही बाब विचारात घेऊन निवड पद्धतीने ‘एल-८८३’ हा खरीप व लेट खरीप लागवडीसाठी शिफारस असलेला कांदा वाण विकसित केला आहे. गेल्या आठ वर्षांपासून त्यावर संशोधनात्मक प्रक्रिया सुरू होती. भारतीय कृषी संशोधन परिषदेने या वाणाची शिफारस प्रसार करण्यासाठी केली आहे.

बाजारात गोल व गडद लाल रंगाच्या कांद्याला मागणी असते, हीच बाजू विचारात घेऊन वाणाच्या अनुषंगाने २०१६ मध्ये चाचण्या सुरू झाल्या होत्या. तर २०१७ पासून मल्टी लोकेशन ट्रायल घेऊन उत्पादन संबंधी निरीक्षणे नोंदविण्यात आली. गुणवत्तापूर्ण कंद निवड व त्याची शुद्धताचाचणीला विचारात घेण्यात आले. त्याचे परिणाम चांगले आल्याने खरीप व लेट खरीप या दोन हंगामांसाठी वाणाची शिफारस आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेने २०२४ मध्ये हा वाण प्रसार करण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यापूर्वी बहुस्थानीय चाचण्यांमध्ये उत्पादन व गुणवत्तासंबंधी चांगले परिणाम दिसून आले आहेत. ‘ऑल इंडिया नेटवर्क रिसर्च प्रोजेक्ट’ कांदा व लसूण माध्यमातून देशातील विविध संशोधन केंद्रांवर परीक्षण करून उत्पादन व गुणवत्तेसंबंधी चाचण्या घेण्यात आल्या. केंद्रीय कृषी मंत्रालयात वाण प्रसार समितीच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होऊन अधिसुचना जारी होईल व वाणास नाव दिले जाईल.

त्यापश्चात पैदासकार, पायाभूत, प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. महाराष्ट्र राज्यासह मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली, ओडिशा, उत्तर प्रदेश, राजस्थान राज्यांतील लागवडीचे चांगले परिणाम आले आहेत. संपूर्ण देशभर या वाणाची लागवडीसाठी शिफारस आहे. नाशिक जिल्ह्यातील चितेगाव (ता. निफाड) येथील संशोधन केंद्रावर या वाणाच्या लागवडी करण्यात आल्या होत्या. परीक्षण करून त्याला अखिल भारतीय कांदा व लसूण संशोधन प्रकल्पाकडे सादर करण्यात आले होते.

वाणाची वैशिष्ट्ये

जमिनीतील अतिरिक्त ओलाव्यास सहनशील.

पुनर्लागवडपश्चात ८० ते ८५ दिवसांत काढणीस तयार होणारा वाण.

आकर्षक व उभट गोल गडद लाल रंगाचा चमकदार कंद.

एकूण विद्राव्य घन पदार्थ १२ ते १३ ब्रिक्स व शुष्क पदार्थ प्रमाण १३ ते १४ टक्के.

कांद्याचा आकार ४.५ ते ५.५ सेमी व्यासाचे आकारमान.

प्रति हेक्टरी ३०० ते ३२५ क्विंटल उत्पादकता.

जोड कांदे निघण्याचे प्रमाण कमी.

लागवडीसाठी हेक्टरी ८ ते १० किलो बियाण्याची गरज.

पारंपरिक उपलब्ध खरीप वाणांच्या तुलनेत टिकवणक्षम

कांदा काढणीनंतर शेतकऱ्यांनी साठवून ठेवताना तीन महिन्यांपर्यंत टिकवणक्षमता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane FRP: साखर कारखान्यांकडे ३,५०० कोटींची एफआरपी थकीत, राजू शेट्टींची माहिती, साखर आयुक्तांची घेतली भेट

Turmeric Price Issues: हळद दरप्रश्नी कायमस्वरूपी उपायोजनांसाठी बैठक घ्यावी

Soybean Crop Insurance: सोयाबीनचा १०० कोटी ४५ लाख २० हजार रुपये विमा परतावा देय

Spice Crops Farming: तीन तालुक्यांत मसाला पिकांवर भर

Gokul Dudh Sangh: 'गोकुळ'वरून राजकीय वादाची ठिणगी; दूध संघावर प्रशासक की निवडणूक, नेमकं काय ठरलं?

SCROLL FOR NEXT