Onion Garlic : राजगुरूनगरची राष्ट्रीय कांदा आणि लसूण संशोधन संस्था देशभरात प्रसिध्द

राष्ट्रीय कांदा आणि लसूण संशोधन संस्था ही भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या अंतर्गत असलेली संशोधन संस्था पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे १९९७ साली स्थापन करण्यात आली.
National Onion and Garlic Research Institute
National Onion and Garlic Research InstituteAgrowon
Published on
Updated on

राष्ट्रीय कांदा आणि लसूण संशोधन संस्था (National Onion and Garlic Research Institute) ही भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या अंतर्गत असलेली संशोधन संस्था पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे १९९७ साली स्थापन करण्यात आली. या संस्थेत कांदा आणि लसूण या पिकांवर संशोधन केले जाते. संस्थेत कांदा आणि लसूण या पिकांच्या नवनवीन जाती विकसित केल्या जातात, तसेच कांदा आणि लसूण बियाण्यांची विक्रीही केली जाते. येथील संशोधक नवीन उत्पादन तंत्रेही विकसित करत असतात.  २०१९ मध्ये कांदा लसूण संशोधन संचालनालायाचे रूपांतर राष्ट्रीय संशोधन संस्थेत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मूलभूत संशोधनाला अजून वेग मिळाला.

National Onion and Garlic Research Institute
Garlic Cultivation : तंत्र लसूण लागवडीचे...

येथे शेतकऱ्यांसाठी कांदा आणि लसूण यांच्या लागवडीबद्दलचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात. काळूस येथे कांदा बियाणे तयार करण्यासाठीचे या संस्थेची जमिन आहे. शेतकऱ्यांना कांदा आणि लसून पिकांबद्दल मार्गदर्शन आणि कृषी सल्लाही दिला जातो. दर महिन्याला पीक सल्ल्याची मार्गदर्शिका प्रसारित केली जाते.

संस्थेने विकसित केलेल्या कांदा आणि लसणाच्या जाती

संस्थेने भीमा लाल, भीमा शक्ती, भीमा किरण, भीमा सुपर या कांद्याच्या जाती विकसीत केल्या आहेत. तर भीमा शुभ्रा आणि भीमा सफेद या पांढऱ्या कांद्याच्या जातीही या संस्थेमार्फत विकसित करण्यात आल्या आहेत. भीमा ओंकार, भीमा पर्पल या लसणाच्या जाती या संस्थेने विकसीत केल्या आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com