Onion Subsidy  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Subsidy : शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसात कांद्याचे अनुदान जमा होणार

onion subsidy maharashtra : अवकाळी पाऊस आणि गारपिठीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील उत्पादकांना प्रति क्विंटलला ३५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय २७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयाने घेतला होता. त्यानुसार हे अनुदान १५ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, अशी माहिती संबंधित मंत्र्यांनी अधिवेशनात दिली होती.

Team Agrowon

subsidy to onion producers : लेट खरीप कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झाल्याने राज्य सरकारने जाहीर केलेले प्रतिक्विंटल ३५० रुपयांचे अनुदान सोमवारी (ता.२१) किंवा मंगळवारी (ता.२२) शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.  

पहिल्या टप्प्यात एकूण मागणीच्या ५३ टक्के निधी प्राप्त झाल्याने ४६५ कोटी ९९ लाख रुपये वितरित करण्यात येतील. २३ पैकी १३ जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांना अनुदान वितरित होईल. तर उर्वरित १० जिल्ह्यांमध्ये प्राप्त निधीच्या टक्केवारीनुसार अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.  

प्रारंभी लेट खरीप कांद्यासाठी असलेल्या या योजनेतील अटी व शर्थी टप्प्याटप्प्याने शिथिल केल्याने अनुदान रक्कम ४६५ कोटी ९९ लाखांवरून ८४४ कोटी ५६ लाखांवर पोहोचली. पावसाळी अधिवेशनात ५५० कोटी रुपयांच्या पुरवणी मागणीद्वारे अनुदानाची तरतूद केली आहे. सध्या वित्त विभागाने पुरवणी मागणीपैकी ४६५ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. उर्वरित निधीही लवकरच दिला जाईल, असे पणन विभागातील वरिष्ठांनी सांगितले.

राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी २०० क्विंटलच्या मर्यादेत साधारणपणे ३५० रूपये प्रतिक्विंटल या दराने अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.

१३ जिल्ह्यांना पूर्ण रक्कम

राज्यातील एकूण २३ जिल्ह्यांमधून कांदा अनुदानाची मागणी करणारे प्रस्ताव विभागास प्राप्त झाले आहेत. यापैकी १३ जिल्ह्यांतील अनुदानाची मागणी अल्प स्वरूपाची आहे  तर उर्वरित १० जिल्ह्यांची मागणी प्रत्येकी १० कोटींपेक्षा जास्त आहे. नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, यवतमाळ, अकोला, वाशीम या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना पूर्ण रक्कम वितरित करण्यात येणार आहे. तर नाशिक, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर, नगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर आणि बीड जिल्ह्यांतील लाभार्थ्यांना ५३.९४ या प्रमाणात रक्कम वितरित करण्यात येणार आहे. या करिता पणन विभागाचे सहसचिव डॉ. सुग्रीव धपाटे हे नियंत्रण अधिकारी असतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT