Onion Subsidy  agrowon
ॲग्रो विशेष

Onion Subsidy : खरीप हंगामामधील कांदा अनुदान रखडले

Kharif Season : खरीप हंगाम २०२३ मधील राहिलेल्या शेतकऱ्यांचे कांदा अनुदानाचे पैसे जमा झाले नाही तर येत्या ता. एक जुलै रोजी दुपारी एक वाजता भूम येथील सहायक निबंधक कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात सांगितले आहे.

Team Agrowon

Latur News : खरीप हंगाम २०२३ मधील राहिलेल्या शेतकऱ्यांचे कांदा अनुदानाचे पैसे जमा झाले नाही तर येत्या ता. एक जुलै रोजी दुपारी एक वाजता भूम येथील सहायक निबंधक कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात सांगितले आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात २०२३ मध्ये कांद्याची लागवड केली होती. परंतु कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये प्रमाणे अनुदान जाहीर केले होते.

त्यानंतर एक हजार १४० शेतकऱ्यांनी अर्ज केले. त्यामधील एक हजार ९५ शेतकऱ्यांना दोन कोटी चार लाख १२ हजार वितरित करण्यात आले आहे. तर यामधील २९ शेतकऱ्याचे व चुकीची दुरुस्तीचे १६ असे एकूण ४५ शेतकऱ्याचे पैसे अद्यापही जमा झाले नाहीत. या शेतकऱ्यांचे आधार नंबर, आयएफसी कोड, अकाउंट नंबर, नावात चूक असणे, या कारणामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याची कारणे समोर येत आहेत.

खरीप हंगामामधील १६ शेतकऱ्यांचे आधार क्रमांक, आयएफसी कोड, खाते क्रमांकात नावात बदल असणे या कारणामुळे कांदा अनुदान या शेतकऱ्यांना जमा झाले नव्हते. ता. १४ जून रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय येथे दुरुस्तीसाठी यादी पाठवली आहे. पुणे कार्यालयाकडून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे.
ए. आर. सय्यद, प्रभारी सहायक निबंधक, भूम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT