Onion seeds  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Seed Rate : कांदा बियाण्याचे दर स्थिरावले

Onion Market : खानदेशात रब्बीतील कांदा लागवडीची तयारी शेतकरी करीत आहेत. त्यासाठी कांदा रोपवाटिका तयार केल्या जात असून, कांदा बियाण्याचे दर स्थिरावल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळत आहे.

Team Agrowon

Dhule News : खानदेशात रब्बीतील कांदा लागवडीची तयारी शेतकरी करीत आहेत. त्यासाठी कांदा रोपवाटिका तयार केल्या जात असून, कांदा बियाण्याचे दर स्थिरावल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळत आहे.

काही शेतकऱ्यांनी ऑक्टोबरमध्येच रोपवाटिकांत बियाणे टाकले. तर काही शेतकरी अद्यापही रोपवाटिका तयार करीत आहेत. मध्यंतरी बियाणे अधिक दरात शेतकऱ्यांना घ्यावे लागेल, अशी स्थिती होती.

परंतु शेतकऱ्यांच्या बियाण्याचे दर मागील काही दिवसांत सतत कमी झाले आहेत. ग्रामीण भागात अनेक शेतकरी दर्जेदार बियाण्याची विक्री करीत आहेत. बियाणे उगवणीशिवाय पैसे देवू नका, अशी हमी घेऊनही काही शेतकरी बियाणे विक्री करीत आहेत.

धुळ्यात शिंदखेडा, शिरपूर, जळगाव जिल्ह्यात जळगाव, एरंडोल, धरणगाव, रावेर, चोपडा आदी भागात अनेक कांदा बियाणे विक्रेते शेतकरी आहेत. ३०० ते ४०० आणि ५०० रुपये प्रतिकिलोने ही विक्री सुरू आहे.

यंदा रोपवाटिकांची संख्याही कमी आहे. अनेक शेतकरी कांदा पिकाकडे वळणार नाहीत, असे सांगितले जात होते. कारण पाऊसमान कमी आहे. ज्या वेळी कांदा शेतकऱ्यांकडे असतो, तेव्हा दर कमी असतात, असाही अनुभव मागील काही महिने राहिला आहे.

यात बियाण्याची उगवण व्यवस्थित होईल की नाही, अशी भीतीही होती. परंतु शेतकऱ्यांनी उत्तम व्यवस्थापन करून रोपवाटिकांमध्ये बियाण्याची उगवणक्षमता टिकविली. काहींची रोपे चांगली वाढत आहेत.

कांदा लागवड धुळे जिल्ह्यात अधिक होईल. साक्री, शिंदखेडा भागात ही लागवड अधिक असेल. तर जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, जामनेर, पाचोरा आदी भागात लागवड होईल, अशी स्थिती आहे. लागवडीस डिसेंबरमध्ये सुरवात होईल. ही लागवड जानेवारीतही सुरू राहील, असे दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

SCROLL FOR NEXT