Onion Seed : बार्शीत ‘लायन्स’कडून ५० शेतकऱ्यांना कांदा बियाणे

Kharif Season : सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. बार्शी तालुक्यात पेरणी योग्य पाऊस झालेला नाही.
Onion Seeds
Onion SeedsAgrowon

Barshi News : शेतीची मशागत करून पेरणीसाठी पावसाची वाट पाहत असताना पुन्हा पावसाने ओढ दिल्याने बळिराजा धास्तावला आहे. अशा निसर्गाच्या दुष्टचक्रात एक हात मदतीचा म्हणून लायन्स क्लब बार्शी रॉयल व तिरुपती अॅग्रो यांच्या संयुक्त विद्यमाने ५० शेतकऱ्यांना ७५ हजार रुपयांचे कांदा बियाण्याचे मोफत वितरण करण्यात आले.

Onion Seeds
Onion Subsidy : शेतकऱ्यांना कांदा अनुदान कधी मिळणार?

तालुक्यातील गरजू ५० शेतकऱ्यांना प्रत्येकी एक किलोची पिशवी याप्रमाणे हे बियाणे देण्यात आले. सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. बार्शी तालुक्यात पेरणी योग्य पाऊस झालेला नाही.

Onion Seeds
NAFED Onion Procurement : ‘नाफेड’चे कांदा खरेदी पोर्टल बंद

शेती मालाला बाजार भाव नसल्याने बळीराजा अडचणीत आला आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना काही तरी मदत व्हावी, या हेतूने लायन्स क्लब, बार्शी रॉयल व तिरुपती अॅग्रो यांनी हा उपक्रम घेतला.

पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री. अंधारे, क्लबचे नूतन अध्यक्ष राजेश खाडे, सचिव मनीष रुगले, खजिनदार शशिकांत बारबोले, माजी प्रांतपाल जितेंद्र दोशी, विभागीय अध्यक्ष अमर काळे, सुनील पाटील, राहुल माढेकर, मनोज पाटील, महावीर शहा, तिरुपती अॅग्रोचे संचालक मंगेश बागूल, सचिन चव्हाण, शिवाजी खळदकर उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com