Onion Price Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Price : आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण, ५०० ते ७०० रुपयांनी घट

Onion market Price : कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे कांद्याचे भाव कमी होऊ शकतात.

Swapnil Shinde

Wholesale onion price : सणासुदीच्या काळात कांद्याचे भाव वाढले असून गेल्या आठवड्यात ३५ ते ४० रुपये किलोने कांदा विकला जात होता. मात्र आता कांद्याचे दर ७५ ते ८० रुपये किलोवर जात आहे. दरम्यान सरकारने बफर स्टाॅक खुला केला आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक वाढली कांद्याच्या दरात ५०० ते ७०० रुपयांची घसरण झाली.

दिवाळीपूर्वी अनेक भाज्यांची मागणी वाढल्याने त्यांचे भावही वाढले आहेत. कांद्यासह काही भाज्यांचे दर दुपटीने वाढले आहेत. नुकतेच पावसाळ्यामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले होते, त्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत. सध्या कांद्याच्या भावात झपाट्याने वाढ झाली आहे. मुंबई आणि पुणे बाजारात कांदा ८० रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. अवघ्या आठवडाभरात कांद्याचे भाव दुपटीने वाढले आहेत.

देशांतर्गत किमती स्थिर राहण्यासाठी आणि ग्राहकांना उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभाग दररोज कांद्याच्या निर्यातीवर आणि किमतींवर लक्ष ठेवत आहे. तसेच सुमारे 16 शहरांमध्ये बफर स्टॉकमधून कांद्याची विक्री सुरू केला आहे. राज्यातील सर्व बाजारपेठांमध्ये कांद्याच्या सरासरी दरात ४.५ टक्क्यांनी घट झाली आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये मागील आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना ५ हजार प्रति क्विंटल भाव मिळत होता. सोमवारपासून आवक वाढल्याने दरामध्ये ५०० ते ७०० रुपयांची घसरण झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT