Soybean Rate : सोयाबीन, कांद्याच्या भावात सुधारणा

खरीप पिकांची आवक आता वाढू लागेल. मुगाचा मुख्य हंगाम संपलेला दिसतोय. आवक आता साप्ताहिक ३० हजार टनावरून १५ हजार टनावर आली आहे.
Soybean Rate
Soybean RateAgrowon
Published on
Updated on

खरीप पिकांची आवक (Kharif Crop Arrival) आता वाढू लागेल. मुगाचा मुख्य हंगाम संपलेला दिसतोय. आवक आता साप्ताहिक ३० हजार टनावरून १५ हजार टनावर आली आहे. सोयाबीनची आवक (Soybean Arrival) राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा व महाराष्ट्रामधून वाढलेली आहे. कांद्याची आवक (Onion Arrival) मात्र कमी झाली. हरभरा, तूर व टोमॅटो यांची आवक आता अपेक्षेप्रमाणे कमी होत आहे. ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे किती नुकसान झाले, त्याचा अंदाज अजून हाती आलेला नाही.

Soybean Rate
Soybean Theft : खोडदला मळणी केलेल्या सोयाबीनवर चोरट्यांचा डल्ला

या सप्ताहात कापूस, कपाशी, मका व टोमॅटो यांचे भाव घसरले. सोयाबीनचे भाव ३.२ टक्क्यांनी वाढले. कांद्याच्या किमती वाढून दोन हजार रूपयांवर गेल्या.

या सप्ताहातील किमतीतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोट मधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) सप्टेंबर महिन्यात घसरत होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव १.४ टक्क्यांनी वाढून ३३,८७० वर आले होते; या सप्ताहात ते १.७ टक्क्यांनी घसरून ३३,२८० वर आले आहेत. नोव्हेंबर डिलिवरी भाव रु. २९,८४० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) ३.९ टक्क्यांनी घसरून रु १,७३२ वर आले आहेत. कापसाचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० आहेत. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत. हेजिंगसाठी अजूनही अनुकूल वेळ आहे.

Soybean Rate
Maize Market Update : मक्याचा बाजार कसा राहील?

मका

मक्याच्या स्पॉट (छिंदवाडा) किमती सप्टेंबर महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात स्पॉट किमती २.३ टक्क्यांनी घसरून रु. २,३०६ वर आल्या आहेत. फ्युचर्स (नोव्हेंबर डिलिवरी) किमती २.५ टक्क्यांनी घसरून रु. २,३२० वर आल्या आहेत. जानेवारी फ्युचर्स किमती रु. २,४४५ वर आल्या आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत.

हळद

हळदीच्या स्पॉट (निझामाबाद) किमती सप्टेंबर महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या ०.३ टक्क्यांनी वाढून रु. ७,२२१ वर आल्या आहेत. नोव्हेंबर फ्युचर्स किमती ३.७ टक्क्यांनी वाढून रु. ७,४३४ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्युचर्स किमती रु. ७,९५४ वर आल्या आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती सप्टेंबर महिन्यात रु. ४,५६० ते रु. ४,७०० दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या १.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,६७८ वर आल्या आहेत.

मूग

मुगाच्या किमती सप्टेंबर महिन्यात वाढत होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात १.८ टक्क्यांनी वाढून रु. ७,००० वर आली आहे. यंदा मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ जाहीर झाला आहे. सध्या किमती हमीभावापेक्षा कमी आहेत.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) सप्टेंबर महिन्यात उतरत होती. गेल्या सप्ताहात ती ०.८ टक्क्यांनी घसरून रु. ५,०७८ वर आली होती. या सप्ताहात मात्र ती ३.२ टक्क्यांनी वाढून रु. ५,१८७ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) या सप्ताहात ती २.३ टक्क्यांनी वाढून रु. ७,३२९ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे.

कांदा

कांद्याच्या किमती सप्टेंबर महिन्यात वाढत होत्या. कांद्याची स्पॉट किमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. १६०८ होती; या सप्ताहात ती वाढून रु. २१५८ वर आली आहे.

टोमॅटो

टोमॅटोच्या किमती सप्टेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) रु. २,१२० होती. या सप्ताहात ती घसरून रु. २,००० पर्यंत आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com