Onion  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Harvesting : खानदेशात कांदा काढणी सुरूच

Onion Production : खानदेशात कांद्याची काढणी, साठवणूक सुरूच आहे. यंदा गहू, मका पीक फारसे परवडले नाही. परंतु कांदा पिकात बऱ्यापैकी पैसा हाती राहत असून, उत्पादनही अनेकांना एकरी १५० ते १५५ क्विंटल एवढे हाती आले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात कांद्याची काढणी, साठवणूक सुरूच आहे. यंदा गहू, मका पीक फारसे परवडले नाही. परंतु कांदा पिकात बऱ्यापैकी पैसा हाती राहत असून, उत्पादनही अनेकांना एकरी १५० ते १५५ क्विंटल एवढे हाती आले आहे.

कांदा दर कमी अधिक होत आहेत. निर्यातबंदी व अन्य समस्या आहेत. यामुळे कांद्याची लागवड कमी झाली होती. धुळे, जळगाव जिल्ह्यात लागवड अधिक घटली. नंदुरबारातही लागवडीत ३० टक्के घट झाली होती. अनेकांनी कांद्याऐवजी हरभरा, मका, गहू पेरणी केली. खानदेशात कांद्यासाठी धुळे जिल्हा प्रसिद्ध आहे.

धुळ्यातील साक्री, धुळे या तालुक्यांत कांद्याची मिळून पाच ते सहा हजार हेक्टरवर लागवड केली जाते. पण या भागात पाऊसमान कमी होते. यामुळे कांदा पीक लागवड रब्बीत किंवा उन्हाळ हंगामासंबंधी घटली. खानदेशात एकूण साडेसात हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. सर्वाधिक लागवड धुळ्यात झाली होती. जळगाव जिल्ह्यात सुमारे तीन हजार हेक्टरवर कांदा पीक होते.

जळगाव जिल्ह्यात यावल, चोपडा, चाळीसगाव, एरंडोल, धरणगाव या भागात लागवड अधिक केली जाते. यावलमधील किनगाव, साकळी, चोपड्यातील अडावद, लासूर, धानोरा परिसर कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. कांदा लागवड खानदेशात नोव्हेंबर ते जानेवारीच्या मध्यापर्यंत झाली होती. या कालावधीत लागवड केलेल्या कांद्याची काढणी, साठवणूक सुरू आहे.

मजूरटंचाईचा सामना

कांदा काढणीसाठी मजुरांची अधिकची गरज असते. मजुरी एकरी तीन ते साडेतीन हजार रुपये एवढी कांदा काढणीसाठी लागत आहे. कांदा काढणीसाठी अनेक गावांत पारंगत मजूर समूह आहेत. त्यांना शेतकरी या कामासाठी वाहतूक खर्च देऊन आणत आहेत. उष्णता व पावसाळी स्थितीही खानदेशात आहे. यामुळे शेतकरी कांदा काढणीच्या धावपळीत आहेत.

बाजारात आवक स्थिर

कांद्याची लागवड यंदा कमी झाल्याने बाजारातील आवक स्थिर आहे. कांद्यासाठी जळगाव जिल्ह्यात जळगाव, यावलमधील किनगाव, चोपड्यातील अडावद, धुळ्यातील धुळे, साक्री, पिंपळनेर (ता. साक्री) येथील बाजार प्रसिद्ध आहेत. अनेक खरेदीदार थेट खरेदीदेखील करीत आहेत.

अनेक शेतकरी मध्य प्रदेशातील इंदूर, गुजरातमधील सुरत, अहमदाबाद येथेही कांद्याची पाठवणूक करीत आहेत. कांद्याला सध्या खानदेशात सरासरी एक हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. थेट खरेदीत दर्जेदार कांद्याची मागणी आहे. या कांद्यासही प्रतिक्विंटल सरासरी १०५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT