Onion Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Cultivation : आळेफाटा परिसरात कांदा लागवड सुरू

Onion Sowing : दरवर्षी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा लागवडी होत असतात. परंतु यंदा कांदा रोपे टाकल्यानंतर भीज पाऊस झाल्याने कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Pune News : आळेफाटा (ता.जुन्नर) परिसरातील आळे, वडगाव आनंद, नगदवाडी, कांदळी, वडगाव कांदळी, साळवाडी, राजुरी या भागात मोठ्या प्रमाणात कांदा लागवडी सुरू झाल्या आहेत.

दरवर्षी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा लागवडी होत असतात. परंतु यंदा कांदा रोपे टाकल्यानंतर भीज पाऊस झाल्याने कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वसाधारणपणे एक एकर क्षेत्राला लागवड करावयाच्या कांद्याच्या रोपाची किंमत चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये आहे.

त्यातही सततच्या होणाऱ्या पावसामुळे कांदा पीक येते की नाही याबाबत साशंकता आहे. दरम्यान, सतत पडणाऱ्या भिज पावसामुळे कांदा रोपांवर बुरशीचा प्रादुर्भाव तसेच रोपे पिवळी पडली आहेत. त्यामुळे लागवडीनंतर ही मोठ्या प्रमाणात मर होताना दिसून येते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पावसामुळे कांदा रोपांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच बियाण्यांचा तुटवडा व कमी उगवणक्षमता यामुळे मोठया प्रमाणात रोपांचा तुटवडा भासत आहे.

एक एकर कांदा लागवडीसाठी रोपांचा ४०ते ४५हजार रुपये खर्च येत असून सध्या कांद्याला अतिशय कमी बाजारभाव मिळत असल्याने खर्च देखील वसुल होत नाही, असे साळवाडी येथील कांदा उत्पादक बाबाजी बांगर यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Crisis: पिके करपली खरीप अडचणीत

Sugar Stock Verification: साखर साठ्याची संयुक्त तपासणी

Agriculture Department: ‘कृषी’तील आस्थापना सेवांना दिरंगाई नको

September Rainfall: सप्टेंबरमध्येही पाऊस कमीच

Sugar Sales Quota: पंधरवड्यासाठी तेरा लाख टन साखर कोटा निश्‍चित

SCROLL FOR NEXT