Onion Cultivation : दौंडमध्ये कांदा लागवडीवर भर

Onion Market : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली आहे.
Onion Cultivation
Onion CultivationAgrowon
Published on
Updated on

Pune News : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली आहे. सध्या कांदा पीक जोमात आले आहे. मात्र, त्याला यावर्षी चांगला दर मिळेल का, असा प्रश्‍न शेतकऱ्यांमध्ये आहे.

तालुक्याच्या पूर्व भागातील आलेगाव, देऊळगावराजे, वडगावदरेकर, खोरवडी, पेडगाव, शिरापूर, हिंगणीबेर्डी आदी गावांमध्ये मुख्य पीक म्हणून ऊस, कांदा, गहू घेतला जातो. तरकारीचीही पिके घेतली जातात. मात्र, यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस गेल्यानंतर खोडवा पीक न राखता कांदा आणि गव्हाच्या पिकाला पसंती दिली आहे.

Onion Cultivation
Onion Cultivation : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३६ हजार हेक्‍टरवर कांदा लागवड

यावर्षी कांद्याला काढणीच्या वेळेस चांगला भाव मिळाला तर साठवण न करता कांदा बाजारात (Kanda Bajarbhav) विकून टाकू, असे काही शेतकऱ्यांनी सांगितले. कांदा लागवडीच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे मजुरांनाही कांदा लागवडीपासून कांदा काढणीपर्यंत काम मिळेल.

Onion Cultivation
Onion Cultivation : नगरच्या पारनेर, श्रीगोंदा तालुक्यांत विक्रमी कांदा क्षेत्र

यंदा पोषक वातावरण

गव्हाच्या पिकाबरोबरच कांदा पीकही जोमात आले आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी कांदा पिकाला अवकाळीचा फटका बसला. त्यामुळे कांदा उत्पन्नात घट होत होती. तरी यावर्षी अजूनपर्यंत अवकाळी पाऊस (Rain) न आल्यामुळे कांद्याला चांगले पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

त्यामुळे कांद्यावर रोगाचे प्रमाणही कमी पडत आहे. रात्रीची थंडीही चांगली पडत आहे. डिसेंबर आणि जानेवारीत लागवडी झालेल्या कांद्याचे उत्पादन (Onion Production) चांगले मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

चालू वर्षी पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे भीमा नदीला पाणी कमी पडेल. खोडवा पीक न राखता त्यामध्ये पूर्ण कांदा लागवड केली आहे. कांदा लागवडीच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे मजुरीत सुद्धा वाढ झाली आहे. यावर्षी कांदा लागवडीत दरवर्षीपेक्षा १५ हजार रुपये जास्त लागेल. त्यामुळे दर सुद्धा योग्य द्यावा.
- माऊली कापसे, देऊळगावराजे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com