Onion Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Crop Damage : पुरंदरमध्ये पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान

Onion Crop Loss : पुरंदर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या कष्टाने जगवलेले कांद्याचे पीक खराब होऊन कांदा उत्पादक अडचणीत येत आहे.

Team Agrowon

Pune News : गेल्या आठवड्यापासून मॉन्सूनोत्तर पाऊस पडत आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून सकाळी धुके, दिवसभर कडक ऊन आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत आहे. यामुळे पुरंदर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या कष्टाने जगवलेले कांद्याचे पीक खराब होऊन कांदा उत्पादक अडचणीत येत आहे. त्यामुळे कांदा पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करू लागले आहे.

मागील सलग तीन-चार दिवसांपासून, जेऊर, पिसुर्टी, मांडकी, हरणी, वाल्हे परिसरात वातावरणात होत असलेल्या बदलामुळे सकाळी ढगाळ वातावरण तयार होऊन, दुपारी कडक ऊन पडून मोठ्या प्रमाणात उष्णता वाढत आहे. तसेच संततधार पाऊस पडत आहे. यामुळे परिसरातील शेतकरीवर्गाच्या शेतातील पाण्यावाचून वाताहात होऊन ही पिके या पावसाने तरली आहेत.

या पिकांमध्ये प्रामुख्याने, बाजरी, सूर्यफूल, सोयबीन, भुईमूग, तूर या पिकासह अनेक पिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. या पावसाने, बळीराजा सुखावला आहे. खरीप व लेट खरिपात तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे.

परंतु चालू कांदा उत्पादन हंगामामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. तर पुरंदर तालुक्याच्या काही भागात मॉन्सून पाऊसही आवश्यक प्रमाणात पडला नसल्याने कांदा उत्पादन घेताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आमच्या भागात मागील आठ दिवसांपासून सलग पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले असून या प्रामुख्याने कांदा पिकांचे नुकसान अधिक आहे. फळबागेचेही नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत येत आहे.
अंकुश जगताप, फळबाग उत्पादक शेतकरी, मांडकी, पुरंदर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

Farm Equipment: मुरुडमध्ये अल्पभूधारकांना कृषी अवजारांचे वाटप

Ahilyanagar Agro Tourism : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटनाची निर्मिती करा

Research Paper Award: श्रीशैल्य हेगान्ना यांना रिसर्च अवॉर्ड

SCROLL FOR NEXT