Onion Subsidy : राज्यातील १३ हजार कांदा उत्पादकांचे रखडलेले २४ कोटी आचारसंहितेपूर्वी द्या, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी

Onion Producers Association : राज्य सरकारने कांद्याला ३५० रूपयांच्या अनुदाना देण्याची घोषणा केली होती. ती आता हवेतच विरल्यात जमा झाली आहे. तर याच अनुदानावरून आता कांदा उत्पादक शेतकरी संघटननेना आक्रमक झाली आहे.
Onion Subsidy
Onion Subsidy Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप ही घोषणा सत्यात उतरलेली नाही. तर राज्यातील १३ हजार कांदा उत्पादकांचे तब्बल २४ कोटी रूपये अनुदान रखडले आहे. हे अनुदान आचारसंहिता लागण्यापूर्वी द्यावे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं केली आहेत.

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने दीड वर्षांपूर्वी प्रतिक्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र दीड वर्षानंतरही राज्यातील सुमारे १२ हजार ९४७ शेतकऱ्यांना अनुदानाची वाट पाहावी लागत आहे. सुमारे १३ हजार शेतकऱ्यांचे २४ कोटी ७७ लाख ३३ हजार रुपयांचे अनुदान सरकारने दिलेले नाही.

Onion Subsidy
Onion Subsidy: कांदा अनुदानासाठी अर्ज कसा आणि कुठे करावा?

यामुळे आता विधानसभा निवडणुकांच्या आधी आचारसंहितेपूर्वी राज्यातील कांदा उत्पादकांना अनुदान मिळणार का?, असा सवाल कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं केला आहे. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने विविध घोषणा करत आहे. यात कर्मचाऱ्यांच्या मानधनासह विविध घोषणांचा पाऊस पाडला आहे. तर सरकारने वेगळ वेगळ्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीतूनही निर्णयांचा धडाका लावला आहे.

पण याच सरकारला आपल्या दीड वर्षाआधी केलेल्या घोषणेचा विसर पडला आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कांदा अनुदान योजना २०२२-२३ मध्ये लागू केली होती. १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीतील कांद्याला अनुदान देण्यात येणार होते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान दिले जाणार होते.

Onion Subsidy
Onion Subsidy : येवल्यातील १७०० शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित

तसेच एका शेतकऱ्याला दोनशे क्विंटलपर्यंतच अनुदान आणि ज्या शेतकऱ्यांचे सातबारा उताऱ्यावर ‘उन्हाळ कांदा नोंद’ अशी नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांनाच हे अनुदान मिळेल, अशी अट घालण्यात आली होती. याअटीमुळे अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला होता. तालुकास्तरीय समितीने अपात्र केले होते. त्यावेळी उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या फेरतपासणी अर्जाद्वारे अशा बाद झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला होता. यात नाशिक जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

दरम्यान कांदा अनुदानावरून संघटनेनं महिन्यापूर्वीच पत्र पुणे येथील पणन उपसंचालक मोहन निंबाळकर यांची भेट घेतली होती. तर निंबाळकर यांनी याबाबत उपसचिवांना ऑगस्ट महिन्यात पत्र पाठवत याबाबत माहिती दिली होती. पण आताही महिना ओलंडूनही अद्याप कोणताही कार्यवाही झालेली नाही. यामुळे देखील कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com