Onion Auction Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Export Ban : केंद्राच्या निर्यातबंदीनंतर व्यापाऱ्यांकडून कांदा लिलाव बंद

Onion Market Update : केंद्र सरकारनं कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत उमटले.

Team Agrowon

Solapur News : केंद्र सरकारनं कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत उमटले. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता शुक्रवारी (ता. ९) अचानक कांद्याचे लिलाव बंद केले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

तसेच व्यापाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकाराने बाजार समितीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पण बाजार समिती आणि पोलिस प्रशासनाने शेतकऱ्यांची समजूत काढत आजच्या कांद्याचे शनिवारी (ता. ९) लिलाव करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकरी शांत झाले.

गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत कांद्याची आवक वाढते आहे. पण आवक वाढली, तरी मागणी असल्याने दर मात्र तेजीत आहेत. गुरुवारी ८५० हुन अधिक कांद्याच्या गाड्यांची आवक होती. शुक्रवारीही पुन्हा ५०० हून अधिक गाड्यांची आवक झाली. दरही सरासरी २८०० ते ३००० रुपये आणि सर्वाधिक ५००० रुपयांवर आहे.

त्यामुळे आवक वाढते आहे. नेहमीप्रमाणे आज सकाळी १० वाजता कांद्याचे लिलाव सुरू होणार होते. पण केंद्र सरकारने निर्यातबंदी जाहीर केल्याने व्यापाऱ्यांनी अचानक कांदा लिलाव बंद केले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी थेट बाजार समितीचे कार्यालय गाठत ठिय्या आंदोलन सुरू केले. तसेच सोलापूर - हैदराबाद महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला.

या आंदोलनाची सूचना मिळतात जेलरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जाफर मोगल यांच्यासह पोलिस बाजार समितीत दाखल झाले. या वेळी संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाच्या कारभारात बाबत उद्दिग्न प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला.

बाजार समिती प्रशासनाचे प्रतिनिधी आणि संचालक केदार उंबरजे यांनीही उपस्थित शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण शेतकरी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत हा निर्णय मागे घ्या, तातडीने लिलाव सुरू करा, अशी मागणी लावून धरली.

‘या’ आश्वासनानंतर आंदोलन मागे

बाजार समितीचे संचालक केदार उंबरजे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना त्यांच्या कांद्याचे काटे तत्काळ सुरू करत शनिवारी (ता. ९) कोणत्याही परिस्थितीत या कांद्याचे लिलाव होतील, असे जाहीर केले. त्याचबरोबर शनिवारी कुठल्याही प्रकारची नवीन आवक बाजारात होणार नाही, अशीही घोषणा केली. या घोषणेमुळे शेतकरी आंदोलन मागे घेण्यास तयार झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT