Research Funding: देशातील संशोधन आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक लाख कोटी रुपयांच्या विशेष निधी देण्याची घोषणा केली आहे. या आर्थिक साहाय्यामुळे उच्चस्तरीय तंत्रज्ञान आणि जोखमीच्या क्षेत्रांतील संशोधनाला चालना मिळू शकेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. .मुळात आपल्याकडे मूलभूत विज्ञान संशोधनासाठीच्या पायाभूत सुविधा सुरुवातीपासूनच कमी आहेत. जगात कुठेही मूलभूत संशोधन झाले की त्यावर आधारित उपयोजित विज्ञानाचा अवलंब आपल्याकडे होतो..Agriculture Research: सहजीवी जिवाणूंमध्ये प्रथमच आढळली वैशिष्ट्यपूर्ण संरचना.यातून आपल्या गरजा काही प्रमाणात भागत असल्या तरी आरोग्य, शिक्षण, शेती यासह उद्योग-व्यवसायांत मूळ समस्या मात्र कायम राहत आहेत. विशेष म्हणजे जागतिक पातळीवर आपण मूलभूत विज्ञान संशोधनात मागे पडलो आहोत..आपल्याकडे जे काही प्रयोगशाळेत संशोधन होते, त्यातील बहुतांश संशोधनाला व्यावसायिक रूप मिळत नाही. शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या पातळीवर गरजेनुसार संशोधनावर भर नसल्यामुळे त्यातूनही फारसे काही साध्य होत नाही. संशोधनात्मक पेटंटच्या.Stanford Research: नद्यांच्या प्रवाहासंबंधी दीर्घकालीन समजुतीला छेद .मुलभूत संशोधनातील आपल्या पिछाडीबद्दल अनेक संशोधकांकडून टिका होऊ लागली. त्यामुळे ह्या सर्व बाबी थोड्या उशिरा का होईना आपल्या लक्षात आल्या. त्यानंतर एनसीएल, एनपीएल, आयआयटी, एआयआयएमएस, आयसीएआर अशा केंद्र सरकार पातळीवरील आणि काही खासगी संस्थाच्या माध्यमातून देशात संशोधन होत होते..परंतु ते पुरेसे नव्हते. त्यामुळे २००६ मध्ये देशात खास मूलभूत संशोधनासाठी ‘आयसर’ (आयआयएसईआर - भारतीय विज्ञान संशोधन आणि शिक्षण संस्था) सुरु करण्यात आले. कृषी संशोधनाच्या बाबतीत बोलायचे झाले तर एकूण खर्चाच्या १० टक्के निधी खर्च होणे अपेक्षित असताना तरतूद मात्र चार ते पाच टक्के केली जाते..इतरही क्षेत्रांची स्थिती यापेक्षा भिन्न नाही. अशावेळी संशोधनासाठी निधीच्या घोषणेचे स्वागतच आहे. क्षेत्र कोणतेही असो संशोधनात केलेल्या गुंतवणुकीने त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने त्याचा परतावा दिलेला आहे, हे अनेक अभ्यासातून पुढे आले आहे..त्यामुळे संशोधन आणि नवसंकल्पनांसाठी घोषित निधीची तत्काळ तरतूद करायला हवी. हा निधी शक्य तेवढ्या लवकर संबंधित संशोधन संस्थाना मिळायला हवा. हे करीत असताना विविध क्षेत्रातील संशोधन क्षेत्रांना आधी दिल्या जात असलेल्या निधीत कपा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.