Farmer Crisis: शेतकऱ्याला संकट आलं म्हणून थांबून कसं चालंल...!
Agriculture Loss Issue: ‘कधी नव्हं तेवढा पाऊस झाला, ढोराईने पात्र सोडलं. पाण्याचा लोंढा घरात, नदीकडच्या शेतात गेला. घरातील सारा संसार भिजून गेला. कापसाचे दोन-तीन एकर पीक, अन् मातीबी वाहून गेली. तुरीच्या शेतात पाणी साचल्याने तूरबी गेली. यंदा हाती काही लागलं असं काही शिल्लक राहिलं नाही.