Pune News: पाणवडी, काळदरी (ता. पुरंदर) परिसरात रानडुकरांचा कळप तसेच मोरांनी अंदाजे पाचशे हेक्टरवरील भात व भुईमूग पीक उद्ध्वस्त केले आहे. या संपूर्ण परिसराचे पंचनामे करून तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. .नुकसानीबाबत वनविभाग, महसूल तसेच कृषी विभागाला पत्राद्वारे कळविल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले आहे. पंचनामे करण्यास उशीर झाल्यास नुकसानग्रस्त भागातील भात व काडाचे २० ट्रक गोळा करून तहसील कार्यालयासमोर आणून टाकण्याचा इशारा शेतकऱ्यांसह डॉ. अक्षय भिसे यांनी दिली आहे..Maize Crop Damage: बुलडाण्यात पावसाचा मका पिकाला तडाखा.पावसाने झोडपले आणि उरलेसुरले रानडुकरांनी उद्ध्वस्त केले, अशी परिस्थिती दहा गावे व वाड्यावस्त्यांवरील शेतकऱ्यांची आहे. पाणवडी, काळदरी, बहिरवाडी, धनकवडी, दवणेवाडी, घेरा पुरंदर, देवडी, केतकावळे, चिव्हेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये रानडुकर व मोरांनी धुमाकूळ घातला आहे. अनेकवेळा वन विभागाकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही..काळजी घेतली तरी वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान टाळता येत नाही. काढणीच्या काळात अवकाळी पावसाचा तडाखा बसला, आता उरले सुरले पीक हातात पडेल, अशी आशा असताना रानडुकरांच्या कळपांनी काढलेले आणि उभे पीक जमीनदोस्त केले. वर्षभर खायचे काय कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा?.Paddy Crop Damage: भातपीक पाण्याखाली.असा प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांपुढे उभा राहिला असल्याचे भिसे यांनी सांगितले. यावेळी समीर भिसे, सोमनाथ मगर, आकाश पिसाळ, अश्विनी मगर, कविता मगर आदी शेतकरी उपस्थित होते..काळदरी व पाणवडी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी लेखी व ऑनलाइन अर्ज केल्यास त्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात येतील. कोणत्याही शेतकऱ्याला अर्ज करण्यात अडचणी येत असतील तर वन विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.सागर ढोले, सासवड वन परिक्षेत्र अधिकारी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.