Onion market  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Traders Strike : कांद्याचे लिलाव आजही बंदचं!, पालकमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्कवाढीच्या विरोधात कांदा व्यापारी असोसिएशन नाशिक जिल्ह्यातलिलाव बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज संपाच्या दुसऱ्या दिवशीही १५ बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट होता.

Swapnil Shinde

Nashik News : कांदावर निर्यात शुल्क लागू केल्याच्या निषेधार्थ नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांनी बुधवारपासून लिलाव बंदचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांमधील कांदा लिलाव सलग दुसऱ्या दिवशी बंदच राहिला आहे. कांद्याची उलाढाल ठप्प झाल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले.

'ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

देशांतर्गत बाजारपेठेतील दर नियंत्रित ठेवण्यासाठी मागील महिन्यात केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू करण्यात आले. तसेच नाफेड आणि ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून कांदा खरेदीला सुरुवात केली. या निर्णयाच्याविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले. तसेच व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत ३ दिवस जिल्ह्यातील लिलाव बंद पाडले होते. केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते

केंद्राने आपला निर्णय कायम ठेवत केला. तसेच नाफेड आणि ‘एनसीसीएफ’ने खरेदी केलेला ५ लाख मेट्रिक टन कांदा बाजारात आल्याने कांद्याचे दर पडले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मालास मागणी नसल्याचा दावा व्यापारी संघटनेने करत लिलाव बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून नाशिकमधील १५ बाजार समिती आणि उपसमितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद पडले आहेत. त्यामुळे कोट्यावधीचे व्यवहार ठप्प झाले.

नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा व्यापाऱ्यांची तातडीची बैठक बाेलावली आहे. दरम्यान, पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत. लासलगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाची बैठक सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Market Rate: सध्या हरभऱ्याचा भाव हमीभावापेक्षा ८०० ते ११०० रुपयांपेक्षा कमी

Irrigation Management: सिंचन व्यवस्थापन अराजकतेच्या वळणावर

Smart Farming: पपई- मिरची- खरबूज पद्धतीतून उत्पन्नाचा हुकमी स्रोत

Dairy Farming Success Story: दुग्ध व्यवसाय हेच झाले माझे विश्‍व

Fertilizer Subsidy: खत अनुदान थेट शेतकऱ्यांना देणे शक्य; डीबीटी यंत्रणा उभारण्याच्या कृषिमंत्र्यांच्या सूचना

SCROLL FOR NEXT