Onion Auction Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Podcast : कांद्याचे लिलाव सुरु; शेतकरी मात्र आक्रमक

Market Update : नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरु झाले. पण कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले.

Team Agrowon

देशातील सोयाबीन प्रक्रिया प्लांट्सनी आज खरेदी भावात जवळपास २५ ते ५० रुपयांची वाढ केली होती. प्रक्रिया प्लांट्सचे भाव ५ हजार ते ५ हजार १५० रुपयांच्या दरम्यान होते. मात्र बाजार समित्यांमधील भावपातळी स्थिर होते. सोयाबीनचे भाव ४ हजार ६०० ते ४ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान पाहायला मिळाले.

आंतराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावातही सुधारणा झाली होती. सोयाबीनचे वायदे १३.१४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे भाव ४०९ डाॅलरच्या दरम्यान पोचले होते. देशातील बाजारात सोयाबीनची आवक गरजेप्रमाणे सुरु आहे. याचा याचाही परिणाम दरावर जाणवत असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.

देशातील बाजारात कापसाचे भाव आजही स्थिर होते. कापसाला आजही ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कापसाची बाजारातील आवक सव्वा लाख गाठींच्या दरम्यान होती. वायद्यांमध्ये मात्र आज कापूस ४०० रुपयांनी नरमला होता. दुपारपर्यंत वायदे ५६ हजार ९०० रुपये प्रतिखंडीवर होते.

तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ८१.७७ सेंट प्रतिपाऊंडवर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये काहीशी वाढ झाली. पण देशातील वायद्यांमध्ये मात्र नरमाई आली. बाजारातील आवक आणि उद्योगांचा उठाव पाहता कापसाची सरासरी भावपातळी आणखी काही दिवस स्थिर दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरु झाले. पण कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले. कांद्याला सरासरी २ हजार ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कांदा भाव निर्यातबंदीनंतर जवळपास २ हजार रुपयांनी कमी झाले. तर बाजार बंद राहील्याने आज आवकही मोठ्या प्रमाणात वाढली होती.

सोलापूरमध्ये आवक एवढी वाढली की लिलाव पार पाडण्यासाठी उद्या आवक बंद ठेवण्यात आली. कारण लाल कांद्याची टिकवणक्षमता कमी असते. त्यातच पावसाचाही परिणाम टिकवणक्षमतेवर झाला आहे. कांद्याचे भाव स्थिरावण्यास आणखी काही दिवस जावे लागतील, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात मक्याचा बाजार मागील काही आठवड्यांपासून हमीभावाच्या काहीसा वर असल्याचे दिसते. पण चालू हंगामातील ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांमध्ये देशात मक्याला हमीभावापेक्षा कमीच भाव मिळाला. केंद्र सरकारने यंदा मक्याला २ हजार ९० रुपये हमीभाव जाहीर केला.

तर बाजारातील सरासरी भावपातळी २ हजारांच्या दरम्यान राहिली. बाजारात सध्या मक्याला २ हजार ते २ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे. मक्याची बाजारातील आकही काहिशी कमीच आहे. पण मक्याचा उठाव वाढलेला नाही. याचा दबाव दरावर दिसून येत आहे. मक्याचा हा बाजार आणखी काही दिवस दिसू शकतो, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील लाल मिरची उत्पादन यंदा घटण्याची शक्यता आहे. यंदा महत्वाच्या लाल मिरची उत्पादक आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यातील मिरची पिकालाही फटका बसला. यामुळे या राज्यांमधील मिरची उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी राहण्याची शक्यता आहे.

सध्या लाल मिरचीला १८ हजार ते ३२ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. महाराष्ट्रातील मिरची पट्ट्यातही सध्या भाव चांगले आहेत. यंदा दुष्काळामुळे यापुढील काळात मिरची उत्पादन घेणे शेतकरी टाळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिरचीच्या भावातील तेजी कायम राहू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT