Banana Orchard Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Banana Production : कांदेबाग, केळी उत्पादनाला मोठा फटका बसणार

Crop Damage : खानदेशात कांदेबाग केळी पिकाची मोठी हानी विविध भागात उष्णता व वादळामुळे झाली आहे. जमिनीचे तापमान ५२ अंश सेल्सीअसपेक्षा अधिक राहीले.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात कांदेबाग केळी पिकाची मोठी हानी विविध भागात उष्णता व वादळामुळे झाली आहे. जमिनीचे तापमान ५२ अंश सेल्सीअसपेक्षा अधिक राहीले. याचा परिणाम पिकवाढीवर झाला असून, बागांच्या निसवणीलाही फटका बसणार आहे. यामुळे पुढे उत्पादन कमी येईल, अशी स्थिती आहे.

कांदेबाग केळीची लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२३ मध्ये झाली होती. काहींनी डिसेंबरमध्येही उशिराची लागवड केली. या बागांची निसवण व काढणीची प्रक्रिया पावसाळ्यात सुरू होते. परंतु या बागांना यंदा उष्णतेचा मोठा फटका बसला आहे. अनेक भागांत कमाल तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले होते. जमिनीचे तापमानही ५२ अंश सेल्सिअसवर अनेक दिवस राहीले. एप्रिलमध्ये सुमारे १२ दिवस कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसवर राहीले.

या महिन्यात तापमानाने कहर केला. पुरेसे पाणी देवूनही कांदेबाग केळी होरपळली आहे. हलक्या, मध्यम जमिनीत बागांना उष्णतेचा मोठा फटका बसला आहे. केळी पीक ४० अंश सेल्सीअसपर्यंतच्या वातावरणात बऱ्यापैकी असते. यापेक्षा अधिक तापमान काही दिवस राहिल्यास पिकाच्या वाढीला फटका बसतो. पिकाची अन्नग्रहण क्षमता पूर्ण खालावते.

खानदेशात एप्रिल व मे महिन्यात केळी पिकासाठी प्रतिकूल वातावरण राहीले. पिकहानी वाढली आहे. यातच वादळी पाऊस, वेगाचा वारा यात केळीची पाने फाटली. यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंद झाली. पिकवाढ झालेली नाही. कांदेबाग केळीची निसवण जूनअखेरीस सुरू होते. परंतु यंदा निसवण काहीशी लांबणीवर पडू शकते. तसेच निसवलणीलाही फटका बसेल. कमी फण्या व दर्जा यावरही परिणाम होणार आहे.

कांदेबाग केळी पीक अनेक भागात सात ते आठ महिन्यांचे आहे. उशिराचे पीक सहा महिन्यांचे होत आले आहे. ऑक्टोबरमध्ये कांदेबाग केळीची काढणी वेग घेते. खानदेशात कांदेबाग केळीची सुमारे १२ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. सर्वाधिक लागवड चोपडा तालुक्यात आहे. त्यापाठोपाठ जामनेर, यावल, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा भागात कांदेबाग केळी पीक आहे.

रावेर, यावल, मुक्ताईनगर भागात कांदेबाग केळी पीक अल्प आहे. या सर्वच भागात केळी होरपळली आहे. या केळीला तापमानाचा दरवर्षी फटका बसत असल्याने उत्पादन किंवा रास २० किलोपर्यंत गाठणेही शक्य होत नाही. यंदाही अशीच स्थिती राहील. तसेच उत्पादन कमी राहणार असल्याने तुटवडादेखील राहू शकतो, अशीही माहिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Cultivation : खानदेशात रब्बी, उन्हाळ कांदा रोपवाटिका निर्मितीची तयारी वेगात

Farmers Compensation : नुकसानग्रस्तांना वेळेत मदत मिळाली पाहिजे

Crop Harvesting : खानदेशात पीक काढणी, मळणीस वेग

Onion Farming : कांदा रोपवाटिका करताना घ्यावयाची काळजी

Cucumber Farming : वाळकीच्या शेतकऱ्यांना मिळतेय काकडीचे सुधारित लागवड तंत्र

SCROLL FOR NEXT