Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : चौदा लाख शेतकऱ्यांना एक हजार कोटींची मदत

Team Agrowon

Mumbai News : जून आणि जुलै महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जमीन आणि पिकांच्या मदतीपोटी एक हजार कोटी ७१ लाख रुपयांच्या वितरणास राज्य सरकारने मंगळवारी (ता. ३) मान्यता दिली. राज्य सरकारने एक हजार कोटी रुपये वितरित करून दुष्काळाच्या झळा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्यात जून आणि जुलैमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागांत झालेल्या नुकसानीचे प्रस्ताव राज्य सरकारकडे दाखल झाले होते. या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील १४ लाख ९ हजार ३१८ शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड आणि लातूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ही मदत मिळेल. पीक नुकसानीसाठी अमरावती विभागातील एकूण ७ लाख ६३ जार २३ शेतकऱ्यांना ५५७ कोटी २६ लाख रुपये, तर छत्रपती संभाजीनगर विभागातील ६ लाख ४६ हजार २९५ शेतकऱ्यांना ४३५ कोटी ७४ लाख रुपयांची मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत मिळेल. तर अमरावती विभागात शेतजमिनीच्या नुकसानीपोटी ७८ कोटी ७५ लाख रुपयांची मदत मिळेल.

अमरावती जिल्ह्यातील ९० हजार २५५ शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीपोटी ६५ कोटी ३२१ लाख ९१ हजार, अकोल्यातील २ लाख ५७१ हजार शेतकऱ्यांना १४४ कोटी २८ लाख, ८११, यवतमाळमधील २ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना १८५ कोटी १० लाख, बुलडाण्यातील १ लाख ४८ हजार ४२३ शेतकऱ्यांना ११५ कोटी, ४० लाख ९८२, वाशीममधील ६० हजार १६५ शेतकऱ्यांना ४७ लाख १४ हजार ७१८ अशी ५५७ कोटी २६ लाख ४४ हजार रुपयांची मदत मिळेल.

नांदेडला सर्वाधिक मदत

छत्रपती संभाजीनगर विभागातील जालन्यातील २८२ शेतकऱ्यांना ३३ लाख ५९ हजार, परभणीतील २०१ शेतकऱ्यांना २७ लाख ७५ हजार, हिंगोलीतील २७ हजार ७४२ शेतकऱ्यांना १४ कोटी ५४ लाख २८ हजार, नांदेडमधील ६ लाख १७ हजार ९११ शेतकऱ्यांना ४२० कोटी ४६ लाख ६१ हजार, बीडमधील १२७ शेतकऱ्यांना ९ लाख ६४ हजार, लातूरच्या ३२ शेतकऱ्यांना २ लाख ९२ हजार अशी मदत देण्यात येणार आहे.

अमरावती विभागात शेतीचे जास्त नुकसान

अमरावती विभागातील शेतजमिनींचे सर्वाधिक तीन जार १८ हजार हेक्टरच्या नुकसानीपोटी ७८ कोटी ७५ लाख ७८ हजार रुपयांची मदत दिली जाईल. यामध्ये अमरावतीमध्ये ५१.८९ हेक्टर, अकोल्यात ४ हजार ३७७.९७, यवतमाळमध्ये १० हजार ७५७, बुलडाण्यात १२ हजार ९०२ आणि वाशिममध्ये १९२९.०९ हेक्टरचे नुकसान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT