Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित

Jalgaon Crop Damage : फक्त पीकविमा धारकांना अलीकडेच किंवा काही दिवसांपूर्वी मदतनिधी मिळाला आहे. परंतु पीकविमा योजनेत सहभागी नसलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून काहीएक मदत मिळालेली नाही.
Crop Damage Compensation
Crop Damage Compensation Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : जळगाव, भडगाव, पाचोरा, चोपडा, यावल, रावेर आदी भागात जूनमध्ये वादळाने केळी व इतर पिकांना फटका बसला होता. यानंतर प्रशासन, लोकप्रतिनिधींचे पाहणी दौरे व आश्वासने व निवेदनांचा रतीब झाला. परंतु शासनाकडून भरपाई अद्याप मिळालेली नाही.

फक्त पीकविमा धारकांना अलीकडेच किंवा काही दिवसांपूर्वी मदतनिधी मिळाला आहे. परंतु पीकविमा योजनेत सहभागी नसलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून काहीएक मदत मिळालेली नाही.

जळगाव तालुक्यातील भोकर, पिंप्राळा महसूल मंडळातील २१ गावांना ९, १० जून रोजी आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने दिलेल्या फटक्यामुळे सुमारे २०९१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. यावल, रावेर, चोपडा, भडगाव, पाचोरा भागातही सुमारे पाच हजार हेक्टरला फटका बसला होता. यात बहुतांश केळीचे क्षेत्र बाधित झाले होते.

Crop Damage Compensation
Flood Damage Compensation : पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी जळगाव जामोदमध्ये आंदोलन

या नुकसानीची बांधावर जाऊन पाहणी नेते, प्रशासनाने केली होती. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी अनेक शेतकऱ्यांना आपल्या व्यथा-वेदना सांगताना अश्रू अनावर झाले. जिल्ह्यात २०२१, २०२२, २०२३ मध्येही वादळी पाऊस झाला आहे. मोठी हानी केळी व इतर पिकांची यात जळगाव, रावेर, यावल, चोपडा, भडगाव, पाचोरा भागात झाली आहे.

Crop Damage Compensation
Crop Damage Compensation : संत्रा बागायतदारांना हवी हेक्‍टरी लाखाची भरपाई

जळगाव तालुक्यात मागील वर्षी गाढोदा, भादली खुर्द, भोकर, पळसोद शिवार, कठोरा, करंज, घार्डी, नांद्रा बुद्रूक, नंदगाव आदींसह परिसरातील शिवारात थेट बांधावर जाऊन लोकप्रतिनिधींनी नुकसानीची पाहणी केली होती. केळी व्यतिरिक्त इतर पिकांची हानी झाली होती. त्यात पपई, टोमॅटो, वेलवर्गीय पिकांसह शेडनेटलाही फटका बसला होता. यातील नुकसानग्रस्तही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यात २०१९, २०२० व २०२१, २०२२ मध्येही अतिवृष्टी झाली. यात कापूस, उडीद, मूग, सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. याबाबतही मदतनिधीची अपेक्षा होती. अहवाल, पाहणी दौरे या काळातही झाले. पण भरपाई मिळालेली नसल्याची स्थिती आहे. याद्या तहसील प्रशासनाकडे आहेत. पण निधी मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्राप्त झालेला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com