Crop Damage
Crop DamageAgrowon

Crop Damage Compensation : चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसान भरपाईसाठी हवेत ५५ कोटी

Heavy Rain Compensation : जून ते जुलै २०२३ हे दोन महिने शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीच्या परिणामी नुकसानकारक ठरले. जिल्ह्याच्या अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतजमीन खरडून गेली.

Chandrapur News : जिल्ह्यात जून ते जुलै २०२३ या कालावधीत अतिवृष्टीने नुकसान झाले. शेती खरडून गेली, तर उभी पिके उद्ध्वस्त झाली. त्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने सर्वेक्षण, पंचनाम्याअंती अंतिम अहवाल सादर केला आहे. त्यानुसार २२ कोटी ७६ लाख ६५ हजार ८७ रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

जून ते जुलै २०२३ हे दोन महिने शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीच्या परिणामी नुकसानकारक ठरले. जिल्ह्याच्या अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतजमीन खरडून गेली. शेतातील उभ्या पिकाचे नुकसान झाले. कृषी व महसूल विभागाने संयुक्‍तरीत्या पंचनामे केले.

Crop Damage
Crop Damage : माना टाकलेली पिके बघवेना, शेतकरी फिरकेना

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध माहितीनुसार, ५२,५१४.६५ हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहे. बाधित गावांची संख्या ८५२, तर शेतकऱ्यांची संख्या ६४ जार ३७९ इतकी आहे. गोंडपिपरी, जिवती, कोरपना, राजुरा, नागभीड, बल्लारपूर या सहा तालुक्यांत सर्वाधिक नुकसान झाले.

Crop Damage
Crop Damage : पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू

खरीप हंगामाच्या सुरुवातीला हा फटका बसल्याने शेतकऱ्यांची आर्थिकस्थिती मोठ्या प्रमाणावर कोलमडली होती. शेतातील उभ्या पिकाचे नुकसान झाले. जिल्ह्याच्या अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतजमीन खरडून गेली. आता प्रशासनाकडून ५५ कोटी ७६ लाख ६५ हजार ८७ रुपयांची मागणी नुकसान भरपाईपोटी करण्यात आली आहे.

तालुकानिहाय शेतकरी संख्या

बल्लारपूर ४१६५

ब्रह्मपुरी १३४४

नागभीड ५७५०

चंद्रपूर २६३१

चिमूर ६३९

सिंदेवाही २१४

गोंडपिपरी १२९५६

पोंभुर्णा १५११

मूल २६५

सावली ५६६

जिवती ९७८३

कोरपना ८००८

राजुरा ७४५५

भद्रावती २१११५

वरोरा ६९७७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com