Electricity
Electricity Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Production : एक हजार ८४९ वीजग्राहक करतात वीजनिर्मिती

Team Agrowon

Electricity Supply Update : हरितऊर्जा निर्मितीला प्राधान्य देत घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती पॅनल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि अतिरिक्त वीज निर्मिती झाली तर ती महावितरणला विकायची या रूफटॉप सोलर योजनेला महावितरणच्या ग्राहकांची वाढती पसंती मिळत आहे.

नांदेड जिल्ह्यातील एक हजार ८४९ वीज ग्राहकांकडून एकूण २६ हजार ३६१ किलोवॅट क्षमतेच्या वीज निर्मितीचा टप्पा गाठण्यात आला आहे. या ग्राहकांना वीजबिलांपासून मुक्त मिळाली असून ते केवळ वापर करणारेच नाही तर वीजनिर्मातेही झाले आहेत. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये यांनी केले आहे.

जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी छतावरील सौरऊर्जा निर्मितीला पसंती दर्शवली आहे. एकूण एक हजार ८४९ वीजग्राहकांनी विविध एजन्सीच्या सहाय्याने सौरऊर्जा निर्मिती संच स्थापित केले आहेत.

यामध्ये सर्वाधिक नांदेड शहर विभागातील एक हजार ५२६ तर देगलूर विभागातील १५६, भोकर विभागातील ८९ आणि नांदेड ग्रामीण विभागातील ७८ वीज ग्राहकांनी या योजनेला पसंती दिली आहे. सौरऊर्जा निर्मितीसाठी रूफ टॉप सोलर योजनेत ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदानही उपलब्ध करून देण्यात आले आहे.

यात घरगुती ग्राहकांसाठी एक ते तीन किलोवॅटपर्यंत ४० टक्के आणि तीन किलोवॅटपेक्षा अधिक ते दहा किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर सामुहिक वापरासाठी पाचशे किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी दहा किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था (Group Housing Society) व निवासी कल्याणकारी संघटना (Residential Welfare Association) ग्राहकांना २० टक्के अनुदान देण्यात येते.

महावितरणने रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा स्थापित करण्यासाठी परिमंडलनिहाय एजन्सीची नियुक्ती केली आहे. त्याची यादी व ऑनलाईन अर्जाची सोय महावितरणच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीजबिलात बचत होते. तसेच नेट मिटरिंगद्वारे महावितरणकडून वर्षाअखेर शिल्लक वीज देखील विकत घेतली जाते.
अनिल डोये, मुख्य अभियंता, नांदेड परिमंडळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Research : अधिक ‘बी१’ जीवनसत्त्व असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

SCROLL FOR NEXT